10

INCOME TAX रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ, २५ टक्केची वृद्धी

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. २५ टक्के ही वाढ झाल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. तसे ट्विट या मंत्रालयाने केलेय.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा 'मिल्ली मुस्लिम लीग' नवा राजकीय पक्ष

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद- दावा या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या हाफिज सईदने आपला राजकीय पक्ष स्थापन केलाय. त्यांने आपल्या पक्षाचे नाव 'मिल्ली मुस्लिम लीग' असे ठेवलेय.

राज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.  

भारताने लष्कर हटविले नाही तर दोन आठवड्यात चीन हल्ला करेल : चीन मीडिया

डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आज शेवटचा दिवस!

आयकर विभागाने शुक्रवारी आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आजा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे करदात्यासाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत.

काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरच्या सोपोर येथे लष्करी जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे.

अयोध्या राम जन्मभूमी वाद, ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी

अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

११.४४ लाख पॅनकार्ड रद्द, तुमचंही झालं नाही ना! असं तपासून पाहा...

केंद्र सरकारने सुमारे ११ लाख ४४ हजार २११ पॅनकार्ड रद्द केली आहेत. रद्द झालेल्या पॅनमध्ये तुमचे नाही ना, तुम्ही आधी तपासून पाहा. 

गुडन्यूज : तात्काळ तिकीट पैसे न देता काढा, अशी आहे पद्धत

तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आयआरसीटीसीसंदर्भात एक बातमी आहे. रेल्वेने तात्काळ तिकीट काढणाऱ्यांसाठी गुडन्यूज दिलेय. नवीन योजनेनुसार रेल्वे प्रवासी तात्काळ तिकिटांचे पैसे नंतर देऊ शकतात. म्हणजेत तुम्ही त्यावेळी विना पैसे तिकीट बुकिंग करु शकता. याचे पैसे तुम्हाला नंतर देता येतील. ही सेवा केवल सर्व तिकिटांसाठी उपलब्ध होती.

रिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?

नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.