मलालावर हल्ला करणारे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात

मुलींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या युवा कार्यकर्ती मलाला यूसुफाजाई हिच्यावर 10 तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तिला देशाबाहेर संरक्षण घ्यावे लागले होते. जगात मलाला हिच्या धाडसाचे कौतुक केल्याने पाकिस्तानची मान खाली गेली. पाकिस्तानी सैन्याने शहापणा दाखवत हल्लेखोर अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे.

PTI | Updated: Sep 13, 2014, 05:09 PM IST
मलालावर हल्ला करणारे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात  title=

इस्लामाबाद : मुलींना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावे यासाठी धडपडणाऱ्या युवा कार्यकर्ती मलाला यूसुफाजाई हिच्यावर 10 तालिबानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. तिला देशाबाहेर संरक्षण घ्यावे लागले होते. जगात मलाला हिच्या धाडसाचे कौतुक केल्याने पाकिस्तानची मान खाली गेली. पाकिस्तानी सैन्याने शहापणा दाखवत हल्लेखोर अतिरेक्यांना ताब्यात घेतले आहे.

मलाला हिच्यावर प्राणघातक हल्ला 2012 मध्ये झाला होता. तिच्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानी सैन्यांनी अटक केल्याची नुकतीच घोषणा केली आहे.

या घटनेच्या वेळी मलाला ही 15 वर्षांची होती. पाकिस्तानी तहरीक-ए-तालिबान या अतिरेकी संघटनने 2012 मध्ये मलाला या शाळकरी मुलीवर स्वात घाटीत अंदाधुंद गोळीबार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  या हल्लात ती गंभीर जखमी झाली. तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी देखील जखमी झाल्या होत्या.

या घटनेनं संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. मुलीच्या शिक्षणासाठी धडपणाऱ्या मलालाचे कौतुक केले केले. दरम्यान, मलालावर हल्ला करण्यामागे टीटीपी या अतिरेकी संघटनेचा सर्वेसर्वा मास्टर माईंड मुल्लाह फझलुल्ला याचा हात असल्याचे नाव सांगितल्याची माहिती,  इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे महासंचालक आसिम सलीम बाजवा यांनी दिली.

या अतिरेक्यांना पकडण्यासाठी पाक सैन्याने स्थानिक पोलिसांची मदत घेतली.  एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बाजवा यांनी दिली. स्वात घाटीत हे अतिरेकी लपले असल्याचे माहिती पडले. त्यानुसार ही कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.