10

फेसबुक, ट्विटर, गूगलप्लसनंतर पंतप्रधान मोदी आता 'इंस्टाग्राम' वर

सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच माहितीय. आज पंतप्रधान इंस्टाग्रामवर आले आहेत. आसियान आणि पूर्व आशियाई शिखर संमेलनाच्या समारंभातील एक फोटो मोदींनी इंस्टाग्रामवर शेअर केला. 

श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करणार

 श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारनं सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारनं हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असं समजतं.

अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

एमआयएमकडून विषाची पेरणी - शिवसेना, प्रणिती शिंदेंना पाठिंबा

ऑल इंडिया मजलिस-इ-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव नाराजी व्यक्त करत जोरदार टीका केली. अल्पसंख्यांक समुदायाच्या डोक्यात 'विष पेरण्याचे' काम करत आहे. महाराष्ट्र सरकारने त्वरीत करावाई करावी, अशी मागणी सेनेने केली आहे.

काँग्रेसशिवास कोणाचाही पाठिंब्याचे स्वागत - भाजप

महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये उद्या विश्वासदर्शक ठराव भाजपकडून मांडण्यात येणार आहे. मात्र, भाजपकडे बहुमत नसताना सरकार स्थापन्याचा दावा केला आहे. काँग्रेस सोडून कोणत्याही पक्षाचा पाठिंबा भाजप घेईल, असे संकेत भाजपचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी दिले आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आम्ही स्वागत करु, असे ते यावेळी म्हणालेत.

श्वासोच्छवासात अडथळा; तनुजा हॉस्पीटलमध्ये

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. 

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पणजी : मनोहर पर्रिकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्याजागी लक्ष्मीकांत पारसेकर यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. हा शपथविधी राजभवनावर पार पडला. 

काळवीट शिकारप्रकरणी सल्लूला दिलासा

अभिनेता सलमान खानला दिलेल्या शिक्षेला स्थगिती देणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.  त्यामुळे सल्लूला दिलासा मिळालाय 

कोलकात्यात रेडअलर्ट: दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

कोलकात्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळं रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळं कोलकाता बंदर भागात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रमाणात वाढविण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर जनतेला नौदलाच्या दोन युद्धनौका पाहण्यासाठी तीन दिवस बंदी घालण्यात आली असून गोदी भागातही लोकांना जाण्यापासून रोखलं जात आहे.

भारतात WhatsApp चे ७ कोटींहून अधिक युजर्स

भारतात व्हॉट्स अॅपच्या सक्रीय युजर्सची संख्या वाढून सात कोटींच्या वर पोहोचली आहे. ही संख्या व्हॉट्स अॅपच्या एकूण युजर्सच्या १० टक्क्यांहून अधिक आहे. व्हॉट्य अॅपचे भारतातील बिझनेज प्रमुख नीरज अरोडा यांनी दिलीय.