मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांना छातीत दुखू लागल्यानं मुंबईतल्या कोकीळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. त्यांचे आप्तेष्ट आणि फॅन्स त्यांची प्रकृती लवकर सुधारावी याची प्रार्थना करतायेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशी कपूर यांची प्रकृती काही दिवसांपासूनच बरी नाहीय. हॉस्पिटलच्या डॉ. राम नारायण यांनी सांगितलं की, “शशी कपूर यांच्या छातीत संसर्ग झालाय. ते आयसीयूमध्ये आहेत मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना अँटी बायोटिक्स दिल्या जात आहेत”.
७६ वर्षीय शशी कपूर यांनी ६० आणि ७०च्या दशकात, ‘सत्यम शिवम् सुंदरम’, कभी-कभी, दीवार, त्रिशूल आणि अजूबा सारखे अनेक दमदार चित्रपट केले. तीन वेळा नॅशनल फिल्म अॅवॉर्ड्स जिंकणाऱ्या शशी कपूर यांना २०१० मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्डनंही सन्मानित करण्यात आलं. २०११मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मानही देण्यात आला.
शशी कपूरचं खरं नाव बलबीर राज कपूर आहे. त्यांची पत्नी आणि ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडल यांचं निधन झालंय. त्यांना दोन मुलं करण कपूर, कुणाल कपूर आणि एक मुलगी संजना कपूर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.