काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल

पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

PTI | Updated: Sep 20, 2014, 04:03 PM IST
काश्मीर हा पाकिस्तानचा भाग, इंच इंच जमीन आणणार - बिलावल title=

इस्लामाबाद : पाकिस्तान पिपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो याने नविन वाद उभा केलाय. भारतातील काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. काश्मीरमधील एक एक इंच जमीन पुन्हा मिळविली जाईल, असे वादग्रस्त वक्तव्य केलेय.

काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. त्यामुळे भारताकडे पाकिस्तानची जमीन परत आणणार आहे. दक्षिण पंजाब आणि काश्मीरमध्येही मी माझ्या पक्षाचा विस्तार करणार आहे, असे  मुल्तान येथे सभेत बोलताना बिलावल म्हणाला.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. आता या विवादास्पद मुद्द्यावर बिलावल भुट्टोने मत व्यक्त केले आहे. बिलावल भुट्टो हा पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती असिफ अली झरदारी व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा पुत्र आहेत. 

काश्मीरमधील जमीन पाकिस्तानची आहे. ती भारताच्या ताब्यात आहे. त्यामुळे काश्मीर परत मिळविणार असल्याचे बिलावलने म्हटले आहे. बिलावल हा बेनझीर यांच्या राटेडेरो भागातून निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.