‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी

अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. 

PTI | Updated: Sep 21, 2014, 09:04 AM IST
‘केबीसी’ला मिळाली पहिली ७ कोटी विजेती जोडी title=

मुंबई: अनेकांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच एका जोडीनं सात कोटी रुपये जिंकलेत. दिल्लीचे नरुला बंधु केबीसीचे पहिले-वहिले सात कोटी रुपयांचे विजेते ठरले आहेत. 

सार्थक आणि अचिन नरुला अशी या विजेती जोडीचे नावं आहेत. या विजेत्या जोडीला बिग बी अमिताभ बच्चन आणि सिद्धार्थ बासू यांच्या हस्ते पुरस्काराचा चेक देण्यात आला. या स्पर्धेसाठी आपण खूप तयारी केली होती, खूप अभ्यास केला, असं या विजेत्या जोडीनं सांगितलं. 

सार्थक आणि अचिन हे दोघंही अत्यंत गुणी आणि हुशार आहेत. कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरं देताना त्यांचा आत्मविश्वास दिसत होता असं महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितलं. तर आपलं ज्ञान वाढवण्यासाठी डेरेक ओब्रियन यांचे पुस्तकं अभ्यासल्याचं नरुला बंधुंनी सांगितलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.