मोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 

PTI | Updated: Sep 28, 2014, 04:39 PM IST
मोदींच्या दणक्यानंतर पाकिस्ताननं मानली स्वत:ची चूक title=

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दहशवादाच्या सावटाखाली पाकशी चर्चा करता येणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला सुनावल्यानंतर पाकनं अखेरीस नमती भूमिका घेतली आहे. भारत - पाकमधील सचिव स्तराची बैठक होत असतानाच काश्मीरमधील हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करण्याची वेळ चुकलीच अशी कबुली पाकिस्तानचे सुरक्षा आणि परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी दिली आहे. 

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरप्रश्न उपस्थित केला होता. यावर शनिवारी नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत काश्मीर प्रश्न उपस्थित करुन काही होणार नाही, असे खडे बोल नरेंद्र मोदींनी सुनावले होते. पाकशी द्विपक्षीय चर्चा करुन मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत. मात्र दहशतवादाच्या सावटाखाली चर्चा शक्य नाही अशी परखड भूमिका मोदींनी मांडली होती. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील काश्मीरमधील फुटीरवादी हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करुन पाकनं द्विपक्षीय चर्चेवर पाणी फेरलं, असं स्पष्ट केलं. 

भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्रधोरण विषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यात अझीझ यांनी काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करणं चुकलंच अशी कबुली दिली. दोन्ही देशांमधील सचिवस्तराची बैठक होणार असतानाच पाकनं हुर्रियतच्या नेत्यांशी चर्चा करणं टाळायला हवं होतं. चर्चा रद्द झाल्यानं दोन्ही देशांमधील नवनियुक्त राष्ट्रप्रमुखांनी चर्चेला नव्यानं सुरुवात करण्याची संधी दवडली असंही अझीझ यांनी स्पष्ट केलं.  

भारतानं चर्चा रद्द केल्याची आम्हाला दुःख आहे. मात्र आता आम्ही पुन्हा चर्चेसाठी तयार असून आता भारत याविषयी सकारात्मक प्रतिसाद देईल का? याकडे पाकचे लक्ष आहे असंही अझीझ यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील मोदींच्या भाषणाचंही अझीझ यांनी कौतुक केलं आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.