भारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. 

PTI | Updated: Oct 5, 2014, 01:45 PM IST
भारतानं पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ title=

कराची: सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असं मुशर्रफ यांनी म्हटलंय. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्यानं घेत नसल्यानं त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. 

देशद्रोहाचा खटला सुरु असलेले पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्य करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मुशर्रफ म्हणाले, नियंत्रण रेषेवर भारताकडून होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन हे दोन्ही देशांसाठी चांगलं नाही. भारतानं आमच्या सैन्याच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. 

तर पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. पाकमधील सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करुन लोकशाही पद्धतीनं स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं मुशर्रफ यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकनं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून १९७१ च्या युद्धानंतर पाकनं पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.