गाजियाबाद : आम आदमी पक्षाचेचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या विरोधात एका व्यक्तीनं तिच्याच फेसबुकवरील फोटोवर अश्लील कमेंट केलीय. या कमेंटमुळं नाराज झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांनी गाजियाबादमध्ये तक्रार दाखल केली. मात्र केजरीवाल यांनी या घटनेला जास्त हवा न देता अश्लील कमेंट करणाऱ्या व्यक्तीला माफ करण्याची मागणी केलीय.
केजरीवालनं फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं की, हा खाजगी सन्मानाचा लढा नाहीय. आपला लढा देशाच्या मान-सन्मानासाठीचा लढा आहे. जर कोणी कोणाच्या वैयक्तीक सन्मानावर हल्ला केला तर त्याचा मुद्दा बनवायला नको, असंही केजरीवाल म्हणालेत.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी अरविंद केजरीवाल यांच्या मुलीच्या फोटोवर एकानं अश्लील कमेंट केली होती. त्यामुळं नाराज झालेल्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाझियाबादच्या सिहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.