10
10
अमेरिकेत सध्या व्हाईट इमरजन्सी, अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात शून्य अंशांखाली पारा उतरला. बर्फामुळे अनेक हायवे बंद असून १९७६ नंतर प्रथमच पडली एवढी थंडी पडली आहे. या थंडीचे सात जण बळी गेले आहेत.
वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे.
रामपाल समर्थकांकडून होणारा सशस्त्र विरोध बघून पोलिसांना वादग्रस्त बाबा आणि सतलोक आश्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक अनुयायांविरोधात राजद्रोह आणि इतर आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय.
फिजीच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशांत महासागरातल्या या छोटेखानी देशासोबत अनेक करार केलेत. यात प्रामुख्यानं संयुक्त ऊर्जा प्रकल्पासाठी ७५ दशलक्ष डॉलर्सच्या कर्जाचा समावेश आहे.
भारतात इबोलाचा पहिला पेशंट आढळलाय, लायबेरियाहून १० नोव्हेंबर रोजी दिल्लीत परतला होता, सध्या या पेशंटला वेगळं ठेवण्यात आल्याची माहिती.
सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.
जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली.
भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.
ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.
पालेभाज्यांमध्ये कोबी अतिशय लाभदायक मानली जाते. यात असे अनेक गुण आहेत जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे कोबीमुळं आपलं पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता दूर राखण्यात कोबी मदत करते. कोबीला भाजीशिवाय सॅलड म्हणूनही खाल्लं जातं.