वादग्रस्त संत रामपालवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा दाखल

रामपाल समर्थकांकडून होणारा सशस्त्र विरोध बघून पोलिसांना वादग्रस्त बाबा आणि सतलोक आश्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक अनुयायांविरोधात राजद्रोह आणि इतर आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 

PTI | Updated: Nov 19, 2014, 01:39 PM IST
वादग्रस्त संत रामपालवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा दाखल title=

हिस्सार, हरियाणा: रामपाल समर्थकांकडून होणारा सशस्त्र विरोध बघून पोलिसांना वादग्रस्त बाबा आणि सतलोक आश्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक अनुयायांविरोधात राजद्रोह आणि इतर आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 

पोलिसांनी सांगितलं की, काल रात्री रामपाल, आश्रमचे प्रवक्ते राज कपूर आणि आणखी एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी पुरूषोत्तम दास विरोधात आयपीसीच्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवलाय.

त्यांच्याविरोधात कलम १२१ (युद्ध करण्याचा प्रयत्न), कलम १२१अ (सरकारविरोधात अपराधिक षडयंत्र रचणं), कलम१२२ (भारत सरकारविरोधात युद्ध करण्यासाठी हत्यारं गोळा करणं) सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी विरोधात कलम १२३ (युद्ध करण्याची इच्छा लपवणं) आणि हत्येचा प्रयत्न, मारहाण तसंच आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवलाय. पोलीस आणि रामपाल समर्थकांमधील संघर्षानंतर गुन्हा दाखल केला गेला. रामपाल समर्थकांनी गोळीबार केला आणि पेट्रोल बॉम्बही फेकले. रामपाल आधीच हत्या प्रकरणातील आरोपी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.