स्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी

ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.

PTI | Updated: Nov 13, 2014, 09:39 PM IST
स्वच्छता अभियान सुरु केले तेच विष पसरवत आहेत - राहुल गांधी title=

नवी दिल्ली : ज्या लोकांनी स्वच्छता भारत अभियान सुरु केला आहे तेच लोक समाजामध्ये विष पसरवण्याचे काम करत आहेत, थेट हल्लाबोल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करत निशाणा साधलाय.

स्वच्छता नावाखाली हे लोक केवळ फोटो काढण्यापुरतेच साफसफाई करत आहेत,असा जोरदार चिमटाही राहुल यांनी भाजपा नेत्यांना काढला. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १२५ व्या जयंती निमित्त दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर स्टेडियमवर काँग्रेसतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर तिखट शब्दात टीका केली.

तापट स्वभावाची लोकं देशावर राज्य करत असून अशा लोकांशी लढा करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच आहे. आमच्या हातून काही चुका घडल्या पण आम्ही आमच्या विचारधारेचा त्याग केलेला नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

पंडित जवाहरलाल नेहरु यांनी नेहमची सर्वांना बरोबर घेऊन चालायचे, पण दुर्दैवाने आता त्यांच्या विचारधारेला संपवण्याचे प्रयत्न आहेत, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. आज नेहरु असते तर त्यांनी तुम्हाला एकत्र या, लोकांमध्ये जा आणि त्यांच्या सुख दु:खाचे साथीदार व्हा, असे आवाहन त्यांनी केले असते, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.