10

सार्क देशांनी दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे - पंतप्रधान मोदी

मुंबईवरील २६\११च्या दहशतवादी हल्ल्याला आज सहा वर्ष पूर्ण झालीत. या हल्ल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क परिषदेत उपस्थित केला. दहशतवादाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्यामुळे सर्वांनी दहशतवादाचा बिमोड केला पाहिजे. त्यासाठी सार्क देशांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी नेपाळमधील सार्क परिषदेत केले.

पाकिस्तानात ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र फिरवलं

पाकिस्तानात एका 28 वर्षीय ख्रिश्चन गर्भवती महिलेला विवस्त्र करून फिरवलं गेल्याची घटना पुढे आलीय. तिनं दिलेलं काम नीट केलं नाही म्हणून तिच्यासोबत हे कृत्य केलं गेल्याचं समजतंय. 

जम्मू-काश्‍मिरात ७०, झारखंडमध्ये ६१.९२ टक्के मतदान

जम्मू- काश्मीर विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील १५ जागांसाठी ७० टक्के मतदान तर झारखंडमध्ये ६१.९२ टक्के झाल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उमेश सिन्हा यांनी दिली.  

काश्मीर, झारखंडमध्ये मतदानाला सुरुवात

जम्मू काश्मीर आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मंगळवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. काश्मीरमधील १५ आणि झारखंडमधील १३ मतदारसंघात हे मतदान होत आहे.

काळ्या पैशाबाबत विरोधक संसदेत आक्रमक

देशाच्या बाहेर असलेला काळा पैसा परत आणण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, विरोधकांची मागणी सत्ताधारी भाजपने मान्य न केल्याने  विरोधक अधिकच आक्रमक झालेत. गोंधळामुळे लोकसभा तहकूब करण्यात आली  आहे.

'२०२०पर्यंत पाकिस्तानकडे दोनशेपेक्षा अधिक अण्वस्त्रं'

२०२०पर्यंत पाकिस्तानकडे २००पेक्षा अधिक अण्वस्त्रं असतील इतकी क्षमता पाकिस्ताननं अण्वस्त्र कार्यक्रमांमधून धारण केली असल्याचं अमेरिकी थिंक टँकचं म्हणणं आहे. यासंबंधातील एक अहवाल तयार करण्यात आला असून धोरणात्मक स्थैर्य यासंबंधात हा अहवाल आहे. 

तिची आत्महत्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासातून, तिघांना अटक

मुलुंडमध्ये शनिवारी एका अल्पवयीन मुलीनं महावीर टॉवर या १२ मजली रहिवासी इमातीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या मुलीच्या आत्महत्येचं गुढ आता उकललं असून आरोपीच्या एकतर्फी प्रेमातून ही घटना झाल्याच समोर आलंय. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच - संजय राऊत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ, असं भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

बाराव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या

डाव्या हाताच्या पंजावर ‘आय हेट यू एम’ लिहून, मनगटाची नस कापून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या सिमरन केणी या दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मुलुंडमधील इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इथल्या महावीर टॉवरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आलं असून एका तरूणीचाही शोध पोलीस घेत आहेत.

मध्यम वर्गियांसाठी आनंदाची बातमी, आयकराची सूट मर्यादा वाढवणार

प्रतिकूल परिस्थिती आणि ठराविक पगारात कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या नोकरदार आणि मध्यमवर्गावर कराचा आणखी बोजा टाकण्याची आपली मनापासून इच्छा नाही. वित्तीय गणित सांभाळत शक्य झालं तर प्राप्तिकरासाठीची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आणखी वाढवली जाऊ शकेल, असे संकेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटलींनी शनिवारी दिले.