10
10
इसिस या अतिरेकी संघटनेत सक्रिय झालेला कल्याण इथल्या आरिब माजिदला याची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज बुधवारी स्वत:हून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विशेष न्यायालयात केला तो ग्राह्य धरत कोर्टानं आरिबला 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली़
मंगळ मोहीम यशस्वी केल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने आज अंतराळ क्षेत्रात आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेय. जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेय.
नव्या हनुमान उड़ीसाठी इस्रो सज्ज झालीय. संपूर्णत: नव्या आकाराचे GSLV मार्क 3 या प्रक्षेपकाची पहिली चाचणी आज घेतली जाणार आहे.
कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन कोळसामंत्री आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्यात यावा असा आदेश विशेष न्यायालयानं सीबीआयला दिला आहे.
उत्तर भारतात गारठा वाढू लागलाय. शिमला आणि मनालीमध्ये शनिवारपासून जोरदार हिमवृष्टी सुरु आहे.
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान नवीन वर्षापासून थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
भारताविरुद्ध शनिवारी सेमिफायनलमध्ये मिळविलेल्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रेक्षकांकडे बघून बोटानं अश्लील इशारे करणाऱ्या पाकिस्तान संघातील दोन खेळाडू अमजद अली आणि मोहम्मद तौसिफ यांना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून निलंबित करण्यात आलंय.
एका ३२ वर्षीय भारतीयाचा आपल्या लग्नाच्या वाढदिवशीच क्रिकेट खेळतांना हृदय विकासाचा झटका आल्यानं मृत्यू झाला.
भारतीय वंशाचे बिझनेसमन एस.पी.हिंदुजांच्या हिंदुजा समूहानं स्पॅनिश औद्योगिक कंपनीसोबत मिळून ब्रिटनचं महत्त्वपूर्ण असलेलं ‘ओल्ड वार ऑफिस बिल्डिंग’चं अधिग्रहण केलंय. या बिल्डिंगमध्ये कधी काळी ब्रिटनचे युद्धकाळातील पंतप्रधान विन्सटन चर्चिल यांचं वास्तव्य होतं.