10

मोदींच्या अटकेची मागणी करावी काय? – ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असं जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

हॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला. 

विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने

लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.

शारदा चिट फंड घोटाळा : पश्चिम बंगालचे वाहतूक मंत्र्यांना अटक

पश्चिम बंगालमधील ममता बॅनजी सरकारमधील आणि तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा यांना शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केली. हा ममता यांना जोरदार झटका मानण्यात येत आहे.

नथुराम गोडसे प्रकरणी साक्षी महाराजांची माफी

नथूराम गोडसेंवरून संसदेत गदारोळ सुरूच आहे. नथूराम गोडसेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या करणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसभेत दिलगिरी व्यक्त केलीय.

सचिन, धोनी, गांगुली, द्रविडला नाही जमले, ते विराटने करून दाखवले

 भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे. 

भारत- पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच - मलाला

 भारत आणि पाकिस्तानच्या समस्या एकसारख्याच आहेत. शिक्षणामध्ये दोन्हीकडे काम करण्याची गरज असल्याचं नोबेल विजेत्या मलाला युसूफझईनं म्हटलंय.

जम्मू-काश्‍मीर ५८ तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदान

जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पाच टप्प्याच्या कार्यक्रमातील तिसरा टप्पा आज मंगळारी पार पडला. जम्मू-काश्मीरमध्ये ५८ टक्के तर झारखंडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

अॅपद्वारे बुक केलेल्या टॅक्सीत तरुणीवर बलात्कार, चालकाला मथुरेतून अटक

२७ वर्षीय एका महिलेवर एका कॅबचालकानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. या कॅबला तिनं शुक्रवारी रात्री गुडगावमध्ये डीनरनंतर घरी परतण्यासाठी बुक केली होती. 

जम्मूत दहशतवाद्यांबरोबर चकमक, ८जवान ३ पोलीस शहीद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११ जवान शहीद झालेत. तसेच सोपिया येथील पोलिस दलाला आपले लक्ष्य केले आहे.