10
10
भारतीय क्रिकेट मंडळाने वर्ल्डकप २०१५साठी संभावित ३० खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यात पाच खेळाडूंना डच्चू देण्यात आलाय.
पॉप स्टार लेडी गागाने मोठा खुलासा केलाय. माझ्यावर किशोरवयात बलात्कार झाला होता. हा काळ दु:खदायक होता. हा हादऱ्यातून आपण काही काळ घालवलाय. मला या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी भावनिक उपचार घेण्याची वेळ आली.
जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. जम्मू-काश्मीरमध्ये ७१ टक्के तर झारखंडमध्ये ६५ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.
जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदानानंतर आज दुसऱ्या टप्प्याचं मतदान होत आहे. १८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार असून जम्मूच्या ९ तर काश्मीरच्या ९ जागांवर मतदान होतंय.
विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली.
सर्वांसाठीच एक गुडन्यूज आहे... सोनं आता अजून स्वस्त होण्याची चिन्हं आहेत. रिझर्व्ह बँकेनं सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथील केल्यानं आता सोन्याच्या किंमती आणखी घटण्याची शक्यता आहे.
वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणं आणि त्याला अटक करणं याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल २६ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी कोर्टासमोर सादर केली आहे.
फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे.
मुंबईतील ७१.९ टक्के बलात्कार प्रकरणात मुलीचा बॉयफ्रेंडचं आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे, लग्नाचे आमिष दाखवून हे बलात्कार घडल्याची धक्कादायक बाब ऑक्टोबर महिन्यात उघड झालेल्या अहवालात ही समोर आली आहे.