सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर

वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

PTI | Updated: Nov 20, 2014, 10:55 AM IST
सेहवाग, गंभीरची भारतासाठी पुन्हा खेळता येण्याची शक्यता धुसर title=

नवी दिल्ली: वाढत चाललेलं वय अन् सुमार फॉर्म लक्षात घेता वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या एकेकाळच्या भारताच्या स्टार क्रिकेटपटूंनी देवधर करंडकामधून माघार घेतली आहे. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडियानं श्रीलंकेला धूळ चारली. याच पार्श्‍वभूमीवर आता राष्ट्रीय संघात आपल्याला संधी मिळू शकत नाही, याकडे गांभीर्यानं लक्ष देत दोघांनीही ‘बॅकफूट’ राहणंच पसंत केलंय. 

३० नोव्हेंबरला मुंबईत होणार्‍या पूर्व आणि उत्तर यांच्यामधील देवधर करंडकाच्या उपांत्य लढतीसाठी निवड समितीनं उत्तर विभागाची टीम निवडली. हरभजन सिंगच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. युवराज सिंगला मात्र अद्याप वर्ल्ड कपमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करता येईल अशी आशा असून त्याला संधीही देण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.