Good News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!

सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. 

PTI | Updated: Nov 18, 2014, 12:16 PM IST
Good News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट! title=

नवी दिल्ली: सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती. 

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 'किसान विकास पत्र' नव्यानं लॉन्च केलंय. हे 1 हजार रुपये, 5 हजार, 10 हजार आणि 50 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. यात गुंतवणूक करण्याची कोणतीही सीमा नसेल. यावेळी अडीच वर्षांनंतर पैसे परत मिळण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलाय. 

यावेळी लॉन्च करण्यात आलेल्या किसान विकास पत्राचं वैशिष्ट्य म्हणजे, जर गुंतवणूकदारांना पैसा परत काढायचा असेल तर दोन वर्ष सहा महिन्यांच्या लॉक इन पिरेडनंतर ते पैसा परत काढू शकतात. यानंतर त्याला सहा महिन्यांनंतर पूर्व निश्चित मॅच्युरिटी वॅल्ह्यूवर मुक्त केले जाईल. सुरूवातीला किसान विकास पत्र विक्रीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध केलं जाणार आहे. मात्र नंतर लवकरच त्याला सरकारी बँकांच्या ठराविक शाखांमध्येही उपलब्ध केलं जाईल. 

अर्थमंत्रालयानं सांगितलं की, हा केवळ छोट्या गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित नसेल तर यामुळं देशात बचत दर वाढविण्यास मदत मिळेल. किसान विकास पत्रामुळं छोटे गुंतवणूकदार फसवणुकीपासूनही वाचू शकतील. या योजनेअंतर्गत जमा झालेला पैसा सरकारजवळ राहील. ज्याचा वापर केंद्र आणि राज्यातील विकास योजनांमध्ये केला जाईल. 

यापूर्वी 'किसान विकास पत्र' ही योजना एप्रिल 1988मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी योजनेत 5.5 वर्षात गुंतवणूक दुप्पट केली जायची. नोव्हेंबर 2011मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. 

  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.