10
10
गोव्यात फुल्ल ऑन सेलिब्रेशन सुरू असलं तरी गोव्यातल्या सेलिब्रेशनला गालबोट लागलंय. गोव्यातल्या कांदोळी किनाऱ्यावर सुरु असलेल्या सुपर सॉनिक पार्टीमध्ये मुंबईची फॅशन डिझायनर इशा मंत्री हिचा मृत्यू झालाय.
नवीन वर्षात स्वयंचलित वाहनं आणि ग्राहकोपयोगी वस्तू महागणार आहेत. या उत्पादनांना ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत उत्पादन शुल्कात देण्यात आलेल्या सूट योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्यानं एक जानेवारीपासून वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे. या निर्णयामुळं सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या राहिलेल्या तीन महिन्यांत अतिरिक्त महसूल मिळेल.
वारंवार सेक्स केल्यामुळं आयुष्य घटतं असा भन्नाट शोध मध्य प्रदेशातील भाजप खासदार आलोक संजर यांनी लावला आहे. एका टेस्ट ट्युब बेबी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.
एअर एशियाचं इंडोनेशियातील सुराबायाहून सिंगापूरला जाणारं विमान १६२ प्रवाशांसह बेपत्ता झालंय. त्यानंतर २४ तासांच्या अथक शोधानंतरही त्याचा कसलाही मागमूस लागलेला नाही. प्रवाशांत १६ लहान मुले आणि नवजात अर्भक यांचा समावेश आहे.
झारखंडचे १०वे मुख्यमंत्री म्हणून रघुवर दास यांनी आज शपथ घेतली. खराब हवामानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. पंतप्रधानांनी ट्विटरवरून झारखंडच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
विधानसभा विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखेपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष रहिभाऊ बागडे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव जाहीर केले. आणि गेल्या दिवसांपासून सुरु असलेला गोंधळ सुपुष्टात आला.
जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळ स्फोटानं हादरलं. राजधानितील गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला असून स्फोटात तीन जण ठार झालेत तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत.