10
10
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर. पाटील यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचं वृत्त आहे. पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत.
भाजपा आणि काँग्रेसजनांनी मतांसाठी पैसे देऊ केले तर ते घ्या. पण आपली अमूल्य मतं मात्र आम आदमी पक्षालाच(आप) द्या, असं आवाहन पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना करून नवा वाद ओढवून घेतला आहे. काँग्रेसनं त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवला असून, केजरीवालांनी यासाठी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.
महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
केंद्र सरकारकडून हस्तक्षेप वाढत असून उपेक्षापूर्ण वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत सेन्सॉर बोर्डाच्या १२ सदस्यांनी शनिवारी आपल्या पदांचा सामूहिक राजीनामा दिलाय. तर बोर्डाचे सदस्य यूपीएचे असून ते राजकारण करत असल्याचा आरोप अरूण जेटली यांनी केलाय.
केंद्रातील भाजप मंत्रीमंडळातील मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना रामपूरच्या न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
अनेकदा सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय आंध्र प्रदेशातील एका हॉटेलमध्ये...
कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.
जम्मू - काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.