10
10
कोळसा कामगारांनी पुकारलेला देशव्यापी संप मागे घेतलाय. कामगारांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय उर्जामंत्री पियूष गोयल यांच्यात सुमारे साडे सहा तास चर्चा झाली.
अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला फब्रेवारी २०१५ मध्ये होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नाही. त्याची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आलेली नाही. यावर प्रतिक्रिया देताना त्याचे वडील म्हणालेत, तो काही बर्फ नाही, की लगेच विरघळून जाईल. त्याची मानसिकता कणखर आहे.
महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो यांनी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये न्यूझिलंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल मॅच होण्याची भविष्यवाणी केलीय.
सॅमसंग इंडियानं मंगळवाली चार नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए३, गॅलेक्सी ए५, गॅलेक्सी ई५ आणि गॅलेक्सी ई७ सॅमसंगने बाजारात आणले.
केंद्र सरकार आणि कोसळ खाण कामगारांची बोलणी फिस्कटल्याने कामगारांची पुकारलेला संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेय. तसं पीटीआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान, या संपामुळे १५०० कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आहे.
विश्वकप २०१५साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑल राऊंडर रवींद्र जडेजाला संधी देताना युवीला डावलण्यात आले आहे.
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकूमास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई हायकोर्टानं सोमवारी राज्य सरकारला केला.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिज शिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी उद्या जेव्हा टीमची निवड करण्यासाठी बैठक होईल, तेव्हा घरगुती मैदानावर युवराज सिंहच्या शानदार खेळीचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.
हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका मॉलमध्ये सुरू असलेल्या मसाज सेंटरच्या आड तिथं सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड झालाय. पोलिसांनी सेंटरचे संचालक, एक तरूण आणि पाच तरुणींना अटक केलीय.
केंद्र सरकारने विना-अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ४३.५० रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे आता गॅस थोडासा व्यस्त झाला आहे.