अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली काही दिवसांपूर्वी आपल्या दोन्ही मुलांसोबत प्रेमानंद महाराजांच्या भेटीला गेले होते. यावेळेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रेमानंद महाराज अतिशय भावुक झाल्याचं दिसत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 12, 2025, 09:41 AM IST
अनुष्का-विराटची भक्ती पाहून भावुक झाले प्रेमानंद महाराज, Video मध्ये दिसले अकाय आणि वामिका  title=

भारतीय क्रिकेट आणि संघाचा टीम प्लेअर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या मुलांसोबत अकाय आणि वामिकासोबत प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते. विराट आणि अनुष्का या व्हिडीओत भक्तीत किती लीन असल्याचं दिसत आहे. अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराज यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. तसेच मला भक्तीचा आशिर्वाद द्या असं प्रेमानंद महाराजांना सांगितलं. अनुष्काची भक्ती पाहता प्रेमानंद महाराज भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.  

एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये प्रेमानंद महाराज डोळे पुसताना दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, महाराजांनी सांगितलं की, अकाय आणि वामिका विराट-अनुष्काच्या मांडीवर बसलेले दिसत आहे. अनुष्का शर्मा यावेळी महाराजांना वेगवेगळे प्रश्न विचारताना दिसत आहे. 

प्रेमानंद महाराजांशी खाजगी संभाषण करण्यासाठी पोहोचलेल्या अनुष्काने तिच्यासमोर तिची अडचण स्पष्टपणे मांडली. अनुष्काने यावेळी प्रेमानंद महाराजांना सांगितले की, मला फक्त भक्तीचा मार्ग अवलंबायचा आहे. एवढेच नाही तर प्रेमानंद महाराजांसमोर अनुष्काने आणखी एक प्रश्न समोर ठेवला की,, 'बाबा मी कुठे अडकले...'

विराट आनंद देण्याच काम करतोय

विराट आज आपल्या खेळातून जगाला आनंद देत आहे. म्हणजे तो एक प्रकारची साधनाच करत आहे, असं प्रेमानंद महाराज म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की, अनुष्का भक्तीच्या मार्गावर आहे. तिचा प्रभाव विराटच्या जीवनावर जास्त आहे. याचा त्यांना आनंद आहे. इतकी प्रसिद्धी आणि यश मिळवूनही, देवावरील या दोघांच्या दृढ विश्वासाचे महाराजांनी कौतुक केले आहे. अनुष्काला त्यांना सांगितले की, ती अनेकदा त्यांच्याशी मनातल्या मनात बोलते आणि त्यांना प्रश्न विचारते पण दुसऱ्या दिवशी त्याच्या अनुयायांसोबतच्या तिच्या दैनंदिन बैठकींमध्ये कोणीतरी त्यांना तेच प्रश्न विचारते. तसेच मला माझ्या प्रश्नांचं उत्तर क्रांती वार्तालाभात याचं उत्तर मिळत असे. देवावर विश्वास ठेवा, मनापासून भक्ती करा. आनंदात राहा. बाकी काहीच नाही. मुलांसोबत या वयात तुम्ही भक्ती मार्गाला लागलात ही खरंच आनंदाची गोष्ट आहे, असं प्रेमानंद महाराजांनी सांगितलं आहे.