इम्फाळ : मणिपूरची राजधानी इंफाळ स्फोटानं हादरलं. राजधानितील गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला असून स्फोटात तीन जण ठार झालेत तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत.
IED द्वारे हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. हा स्फोट परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करून घडविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आयईडीचा वापर केलेला हा बॉम्ब इम्फाळमधील बाजारपेठेजवळच्या रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता.
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकही मजूर मणिपुरी नाही. ते खोयाथोंग येथे एका दुकानात चहा घेण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. राज्यात या वर्षी बिगर मणिपुरी लोकांवर अनेकदा हल्ले झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.