अतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.

PTI | Updated: Jan 19, 2015, 08:14 AM IST
अतिरेकी हल्ला केलात तर बघा, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्याआधी अमेरिकेनं पाकिस्तानला खरमरीत इशारा दिला असून, ओबामा यांच्या भारत दौऱ्यात दहशतवादी हल्ला आणि सीमापार घातपात होता कामा नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही सांगण्यात आलं आहे.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा उपस्थित राहणार आहेत. अमेरिका आणि भारत ओबामा यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट काळजी घेत आहे, कारण या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या कालावधीत दोन तास वा त्यापेक्षा अधिक काळ खुल्या मंचावर असतील. 

ओबामा यांच्या भारत दौऱ्याच्या काळात पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाच्या कोणत्याही कारवाया करता कामा नये किंवा तसे प्रयत्न करताही कामा नयेत. पाकिस्ताननं काही आगळीक केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, कोणत्याही हल्ल्याचा माग काढला जाईल, असं पाकिस्तानला बजावण्यात आलं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.