लखनऊ : केंद्रातील भाजप मंत्रीमंडळातील मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना रामपूरच्या न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
नक्वी यांनी जमावबंदी अर्थात कलम १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणात सहा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या न्यायालयाने जमावबंदीप्रकणी दोषी ठरवले. त्यामुळे नक्वींना सहा महिन्याचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
दरम्यान, न्यायालयाने शिक्षा सुनावताच नक्वी यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र त्यांच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल करताच, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज मान्य केला.
लोकसभेच्या २००९ च्या निवडणुकीत नक्वींनी कलम १४४ चे उल्लंघन केले. याप्रकरणी रामपूरमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.