जम्मू -काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट

जम्मू - काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

PTI | Updated: Jan 9, 2015, 06:55 PM IST
जम्मू -काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट title=

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीर विधानसभेत त्रिशंकू स्थिती अस्तित्वात आल्यानंतर आता कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

ओमर अब्दुल्ला यांनी काळजीवाहू मुख्यमंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी केल्याचा अहवाल राज्यपाल एन.एन.वोरा यांनी राष्ट्रपतींकडे पाठवला. त्यांनतर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिलेल्या अहवालात दोन ते तीन पर्याय नमूद करण्यात आले होते. यामध्ये कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापनेचा दावा अजूनपर्यंत केलेला नसल्याने जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्याचे सूचविण्यात आले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.  

२० डिसेंबर रोजी झालेल्या जम्मू-काश्मीर निवडणूक निकालांमध्ये पीडीपी पक्ष २८ जागांवर विजयी होऊन सर्वात मोठा पक्ष ठरला  त्यानंतर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यांने २५ जागांवर यश मिळाले. नॅशनल कॉन्फ्रेन्सला १५ तर, काँग्रेसला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.