फिरोजशाह कोटला मैदानात दिसणार गंभीर, सेहवागचा जलवा!

कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

PTI | Updated: Jan 12, 2015, 08:07 PM IST
फिरोजशाह कोटला मैदानात दिसणार गंभीर, सेहवागचा जलवा! title=

नवी दिल्ली: कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

दिल्लीची टीमनं आपल्या चारपैकी तीन मॅच जिंकलेल्या आहेत आणि इथं जर वातावरणानं सोबत केली तर फिरोजशहा कोटला मैदानावर ओडिशाच्या कमकुवत टीमला हरवून टीम अव्वल स्थानी आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. गंभीरनं डिसेंबरच्या सुरूवातीला सौराष्ट्र विरुद्ध १४७ रन्सची खेळी खेळून सीरिजची शानदार सुरूवात केली होती. तर सेहवागनं नवीन वर्षाची सुरूवात लाहलीमध्ये हरियाणाविरुद्ध तडाकेबाज सेंच्युरी ठोकून केली.

वर्ल्डकपसाठी निवडल्या गेलेल्या टीममध्ये जागा न मिळाल्यानं दोन्ही बॅट्समननं आता आपली नजर निवडकर्त्यांना आपल्या बॅटनं उत्तर देण्यावर टिकलेली असेल. फिरोजशहा कोटला मैदानावर मॅच धुक्यानं प्रभावित असली तरी दिल्लीची टीम फार्मात आहे. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी बोनस गुणही मिळवलेत. सहवाग आणि उन्मुक्त चांदनं सत्रात आतापर्यंत दोन-दोन सेंच्युरी ठोकल्या आहेत.  गंभीरनंही एक सेंच्युरी केलीय. त्यात त्याची बॅटिंग जबरदस्त दिसली. 

सेहवागनं लाहलीमध्ये १८१ बॉल्समध्ये १६ चौकार आणि १ षटकार मारून १४७ रन्सची खेळी खेळली. मात्र खराब हवामानामुळे अखेरच्या दिवशी खेळ रद्द झाल्यानं मॅच ड्रॉ झाली होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.