पाहा CCTV फुटेज: टेबल टेनिस कोच आणि महिला खेळाडूंचे गुलछर्रे

अनेकदा सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय आंध्र प्रदेशातील एका हॉटेलमध्ये...

PTI | Updated: Jan 14, 2015, 06:32 PM IST
पाहा CCTV फुटेज:  टेबल टेनिस कोच आणि महिला खेळाडूंचे गुलछर्रे title=

नवी दिल्ली : अनेकदा सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय आंध्र प्रदेशातील एका हॉटेलमध्ये...

छत्तीसगडची महिला टेबल टेनिसपटू आणि प्रशिक्षकाचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. छत्तीसगडची टेबल टेनिस महिला सब-ज्युनिअर टीम आंध्र पदेशात राष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती. त्यावेळी एक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाचा हॉटेलमधील व्हिडिओ समोर आला आहे.

काय आहे प्रकरण?

आंध्र प्रदेशात २० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ७६ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी छत्तीसगड महिला सबज्युनिअर संघही सहभागी झाला होता. या संघात १६ महिला खेळाडू होत्या.
 
हा संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमध्ये संघातील एक महिला खेळाडू आणि प्रशिक्षकाची ‘क्रीडा’ सीसीटीव्हीत कैद झाली. ही महिला खेळाडू आणि कोच मस्तीच्या मूडमध्ये होते. त्यामुळे हॉटेलमधील सीसीटीव्हीकडे त्यांचं लक्ष नव्हतं.
 
रात्री ११ ते दोन वाजेपर्यंत कोच आणि महिला खेळाडूची मस्ती रंगली होती.  या दरम्यान दोघं एकमेकांच्या रुममध्ये जाताना सीसीटीव्हीत दिसले.
 
प्रकरण कसं समोर आलं?
 
हॉटेलमधील कोच आणि महिला खेळाडूचे गुलछर्रे रायपूरच्या एका डॉक्टरनं सर्वांसमोर आणले. डॉक्टर स्वत:च्या मुलीला घेऊन या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेशांत गेले होते.
 
डॉक्टरांच्या मुलीलाही या कोचने अनेकवेळा हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितलं होतं, मात्र तीनं कधीही त्याला जुमानलं नव्हतं, असं डॉक्टरनं सांगितलं.
 
“या कोचनं सातत्यानं याबाबतची विचारणा केल्यामुळं आपल्याला शंका आली. त्यामुळं मी अन्य खेळाडूंशी याबाबतची चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमधील मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन सीसीटीव्ही फुटेज मिळवलं” असं डॉक्टरनं म्हटलं आहे.
 
दरम्यान या प्रकरणी संबंधित प्रशिक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच छत्तीसगड असोसिएशनच्या सचिवांनीही या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. त्यांनी राजमुंदरीमध्ये सब ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी कोचला तिथं पाठवलं होतं. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.