ओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.

PTI | Updated: Apr 20, 2015, 07:57 PM IST
ओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड title=

बंगळुरू: मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.

टूर्नामेंटच्या आयोजकांच्या वक्तव्यानुसार आयपीएल आचार संहितेमध्ये ओव्हरची गती कमी असण्याच्या प्रकरणात या सत्रात पहिल्यांदाच दोषी मानलं गेलंय. म्हणून रोहितला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. 

रोहितनं या मॅचमध्ये १५ बॉल्सवर ४२ रन्स बनवले त्यामुळंच त्याची टीम मुंबई इंडियन्स आयपीएल ८च्या सिजनमध्ये आपला पहिला विजय मिळवू शकलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.