चीनच्या 'श्याओमी' कंपनीचे रतन टाटांनी घेतले शेअर्स

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि नामांकित उद्योजक रतन टाटा यांनी 'श्याओमी' या चीनी मोबाईल कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत भागिदारी असणारे रतन टाटा हे पहिलेच भारतीय ठरलेत. 

PTI | Updated: Apr 27, 2015, 01:00 PM IST
चीनच्या 'श्याओमी' कंपनीचे रतन टाटांनी घेतले शेअर्स title=

नवी दिल्ली: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि नामांकित उद्योजक रतन टाटा यांनी 'श्याओमी' या चीनी मोबाईल कंपनीचे शेअर्स विकत घेतलेत. चीनी स्मार्टफोन कंपनीत भागिदारी असणारे रतन टाटा हे पहिलेच भारतीय ठरलेत. 

मात्र टाटा ग्रूपच्यावतीनं नव्हे तर रतन टाटा यांनी वैयक्तिक स्वरुपात ही गुंतवणूक केलीये. टाटा यांनी या कंपनीत किती शेअर्स खरेदी केलेत हे जाहीर करण्यास श्याओमी कंपनीनं नकार दिलाय. 

रतन टाटा श्याओमीच्या संचालक मंडळाशी जोडले जाणे ही आनंदाची बाब असून कंपनीच्या भारतातील वाटचालीत त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल, असं श्याओमी इंडियाचे प्रमुख मनु जैन यांनी सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.