जनता परिवार एक पण मतभेद कायम

जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.

PTI | Updated: Apr 16, 2015, 08:56 PM IST
जनता परिवार एक पण मतभेद कायम title=

नवी दिल्ली: जनता परिवार एक झाला असला तरी अजूनही सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीत. जनता परिवाराचं नाव काय असावं आणि चिन्ह कोणतं असावं, यावरून अद्यापही मतभेद आहेतच. मोदींच्या विरोधात एकवटलेल्या जनता परिवाराचं पुढं काय होणार, असा प्रश्न निर्माण होतोय.

राम मनोहर लोहियांचे सगळे वारसदार... आता पुन्हा एकदा एका छत्राखाली एकत्र आलेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता करिश्मा आणि बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुका. या पार्श्वभूमीवर जनता परिवार पुन्हा एक झालाय. नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखण्यासाठी आणि बिहार-यूपी ताब्यात ठेवण्यासाठी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आता सपा, आरजेडी, जेडीयू, जेडीएस, आयएनएलडी आणि समाजवादी जनता पार्टी हे सहा पक्ष एकत्र आलेत.

जनता परिवारातल्या या सहा पक्षांकडे सध्या 5 राज्यात 424 आमदार आहेत. तर 15 लोकसभा आणि 30 राज्यसभा खासदार आहेत. उद्या कोणतंही विधेयक राज्यसभेत रोखून धरण्याची ताकद त्यांच्यात आहे. बिहारमध्ये लालू-नितीश एकत्र लढले तर फायदा होईल... आणि यूपीमध्ये सपाच्या मदतीनं जनता परिवार दलित- ओबीसी मतदारांना खेचू शकतो.

दरम्यान, जनता परिवाराचं गणित अद्याप पूर्णपणे जुळलेलं नाही. नाव आणि चिन्हावरून मतभेद आहेत. या विलिनीकरणाचा बिहारला फायदा होईल. परंतू उत्तर प्रदेशचं काय असा सवाल विचारला जातोय. यातून हे नेते कसा मार्ग काढतात आणि भाजपच्या व्यूहरचनेला कसं तोंड देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.