पंजाबच्या विजयाचं श्रेय सेहवागनं संपूर्ण टीमला दिलं

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कार्यवाहक कॅप्टन विरेंद्र सेहवागनं आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. सोबतच शॉन मार्श आणि डेव्हिड मिलरची स्तुतीही केलीय.

PTI | Updated: Apr 22, 2015, 01:05 PM IST
पंजाबच्या विजयाचं श्रेय सेहवागनं संपूर्ण टीमला दिलं title=

अहमदाबाद: किंग्ज इलेव्हन पंजाबचा कार्यवाहक कॅप्टन विरेंद्र सेहवागनं आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. सोबतच शॉन मार्श आणि डेव्हिड मिलरची स्तुतीही केलीय.

मार्थनं 65 तर मिलरनं 54 रन्स केले. ज्यामुळं पंजाबच्या टीमनं पहिले टाय आणि नंतर सुपर ओव्हरमध्ये नऊ रन करून मॅच जिंकली. 

सेहवागनं मॅचनंतर म्हटलं, अतिशय रोमांचकारक मॅच झाली. त्यांनी जशा पद्धतीनं सुरुवात केली आम्हाला वाटलं ते 200हून अधिक रन्स बनवतील. मात्र अखेरच्या ओव्हर्समध्ये बॉलर्सनी विकेट्स घेत त्यांना 191 रन्सवर रोखलं. शॉन मार्श आणि डेविड मिलरनं शानदार बॅटिंग केली. अखेर अक्षर पटेल आणि मिशेल जॉनसननं मॅच टाय करवली. 

सुपर ओव्हरच्या बॉलिंगबद्दल सेहवाग म्हणाला, मिशेल जॉनसन आमचा सर्वात अनुभवी बॉलर आहे आणि तो फास्ट बॉलिंग करतो. म्हणून आम्ही त्याला निवडलं आणि दुसरीकडे रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉटसन म्हणाला, मी पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये खेळत होतो. हा चांगला अनुभव होता. आम्ही अखेरच्या ओव्हर्समध्ये खूप रन्स दिले ज्याची शिक्षा मिळाली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.