10

जयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?

जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं. 

मतदानाद्वारे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश 'आर्यलँड'!

आर्यलँड आज जगातिल पहिला असा देश बनलाय जिथं मतदानाच्या आधारावर पहिल्यांदा समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलीय. डबलिनमध्ये मोठ्या संख्येनं या विवाहाचे समर्थक एकत्रित आले. एकवेळी सर्वात शक्तिशाली कॅथलिक चर्च असलेल्या आर्यलँडसाठी हा धक्का आहे.

जयललिता पुन्हा होणार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री

जयललिता यांची तामिळनाडू विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालीय. एआयएडीएमकेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीनगरमध्ये पुन्हा पाकिस्तानी झेंडे फडकविलेत

श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी झेंडे फडकवण्यात आल्याची घटना आज घडली. हुरियत नेते मिरवैझ उमर फारूक यांच्या समर्थकांनी हे पाकिस्तानचे आणि लष्कर-ए-तय्यबाचे झेंडे फडकावलेत. 

भ्रष्टाचाराला पाठिशी घालण्यासाठी मोदींचा 'जंग' : केजरीवाल

भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नायब राज्यपाल जगं यांना अभय देत आहे,असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

महिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं

वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.

1 जूनपासून बिघडेल आपलं बजेट,14 टक्के सर्व्हिस टॅक्स होणार लागू

बजेट 2015-16मध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करण्यात आलीय. 12.36 वरुन 14 टक्के सर्व्हिस टॅक्स करण्यात आला. 1 जूनपासून हा नवा सर्व्हिस टॅक्स लागू होणार आहे. त्यामुळं आता रेस्टॉरंटमधील जेवण, विमा क्षेत्र आणि फोन बिल सारख्या गोष्टी महागणार आहेत.

आयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड

आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली. 

इराकच्या रमादी शहरावर इसिसचा ताबा, लढाई सुरूच

इराकमधल्या रमादी शहरावर इसिस या दहशतवादी संघटनेनं ताबा मिळवलाय. इथून मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि इराकी सैनिक पळून गेलेत. 

बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड, कोहली कॅप्टन?

राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची घोषणा करणार आहे. विराट कोहलीच्या हाती टीमची कमान सोपविणार असल्याचं नक्की मानलं जातंय. बीसीसीआयनं सांगितलं की, सीनिअर राष्ट्रीय निवड समितीची 20 मेला बैठक होणार आहे. ज्यात बांग्लादेशविरुद्ध 10 ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या एक टेस्ट आणि 10 जूनपासून मीरपूरमध्ये होणाऱ्या तीन वनडे मॅचसाठी टीम निवडली जाईल.