10
10
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी टर्किच्या कार्गो विमानातून किरणोत्सरी पदार्थाचा उत्सर्ग झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली.
तेलंगणामध्ये उष्माघातानं आणखी १०० जणांचा बळी घेतला असून देशात उष्मा घातानं घेतलेल्या बळींची संख्या अठराशेच्यावर गेली आहे.
राजस्थानात रेल रोको, रास्ता रोको करणा-या गुर्जर समाजाची आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस सुरु असलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. या आंदोलनामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता.
देशभरात उष्णतेची लाट आहे. आत्तापर्यंत चौदाशे बारा लोकांचा उष्माघातानं मृत्यू झालाय. पुढील दोन दिवस तापमान चढेच राहिल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
सिंगापूर एअरलाइन्स (एसआयए)मध्ये बसून शांघायला जाणाऱ्या प्रवाशांचा जीव काठावर आला जेव्हा खराब वातावरणामुळे विमानाच्या इंजिनामधील वीज अचानक गेली. विमानातून १९४ प्रवासी प्रवास करत होते.
डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन कधीही दिले नव्हते. तसेच वेगळ्या विदर्भ निर्मितीचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेखही केलेला नाही, असे स्पष्टीकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विदर्भबाबत एका प्रश्नावर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठी स्वप्न दाखवून सत्तेत आलेत. मात्र, त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही दिवास्वप्न आहेत. कारण प्रत्यक्षात वास्तवापासून ती दूर आहेत, असे मत काँग्रेस नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले.
स्वित्झर्लंडनं स्विस बँकेत खातं असणाऱ्या विदेशी नागरिकांची नावं जाहीर केले आहेत. त्यात दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. स्वित्झर्लंडनं त्याच खातेदारांची नावं जाहीर केलं ज्यांच्याविरुद्ध स्वित्झर्लंडमध्ये चौकशी सुरू आहे. स्वित्झर्लंडनं आपल्या सरकारी राजपत्रामध्ये या खातेदारांची नावं सार्वजनिक केली आहे.
नोबेल पुरस्कारविजेते अमेरिकेतील प्रसिद्ध गणितज्ज्ञ जॉन नॅश यांचं निधन झालंय. शनिवारी न्यू जर्सीत एका अपघातात नॅश यांचा दुर्दैवी अंत झालाय.या अपघातात नॅश यांच्या ८२ वर्षीय पत्नी एलिशिया यांचाही करुण अंत झालाय.