नवी दिल्ली: बजेट एअरलाइन्स स्पाइसजेटनं आपल्या डोमेस्टिक लाइन्सवर एसी-२ टायर ट्रेनच्या भाड्यापेक्षाही स्वस्त भाडं दिलंय. सोमवारपासून विमानसेवा तिकीटांवर ही ऑफर सुरू झालीय. कंपनीनं या अंतर्गत १.५० लाख सीट्सवर ही ऑफर दिलीय. विमान प्रवास भाडं असेल अवघे ९९९ रुपये.
कंपनीनं सांगितलं की, ही ऑफर त्याच व्यक्तींसाठी आहे, जे केवळ केबिन बॅगेज म्हणजे हँडबॅगसह प्रवास करू इच्छितात. ज्यांचं लगेज हँडबॅग पेक्षा जास्त असेल त्यांना १५ किलोपर्यंतच्या सामानासाठी ७५० रुपये द्यावे लागतील.
सोमवारी सुरू झालेली ही ऑफर तीन दिवसांसाठी आहे. 'ट्रॅव्हल लाइट' अंतर्गत प्रवासी १ जुलै ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रवास करू शकतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.