अखेर काँग्रेसनं केलं कबुल, काँग्रेससाठी मोदी मोठं आव्हान!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज कबुल केलं.
Nov 10, 2013, 05:03 PM ISTमहाविद्यालयीन निवडणुका जुन्याच पद्धतीने?
यंदा कॉलेजमध्ये निवडणुका होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती मात्र आता विद्यापीठाने काढलेल्या नविन परिपत्रकानुसार जीएस निवडणुका जुन्या पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 7, 2013, 05:55 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM ISTमोदींची सुरक्षा वाढली, पंजाबच्या प्रचारसभेतही घातपाताची शक्यता?
पाटणातल्या स्फोटानंतर नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत पुन्हा घातपात होण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागानं पंजाब पोलिसांना याबाबात इशारा दिला आहे.
Nov 4, 2013, 12:52 PM ISTआता निवडणूक नाहीच- शरद पवार
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
Nov 4, 2013, 09:20 AM ISTलोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व
शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.
Oct 29, 2013, 11:37 AM ISTनितीशकुमारांच्या बिहारमध्ये आज मोदींचा ‘हुंकार’!
पंतप्रधान पदासाठी मोदींना कडाडून विरोध करणाऱ्या नितिशकुमारांच्या आखाड्यात अर्थात बिहारमध्ये आज नरेंद्र मोदींची जाहिर सभा होतीये. त्यामुळं मोदींच्या आजच्या हुंकार रॅलीतील भाषणाकडे आणि मोदी नितिशकुमारांवर काय बोलतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष्य लागलंय.
Oct 27, 2013, 08:28 AM ISTमोदी पंतप्रधान झाले तर आनंदच – अडवाणी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अखेर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची स्तुती करत मोदी पंतप्रधान झाल्यास आपल्याला आनंदच होईल असं म्हटलंय. मोदींची स्तुती करुन अडवाणींनी आपली नाराजी दूर झाल्याचंच दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय.
Oct 17, 2013, 07:59 AM IST'एमसीए'समोर मुंडे देणार मुंबईकर असल्याचे पुरावे!
एमसीए निवडणुकीसाठीची उमेदवारी रद्द झाल्यामुळं नाराज झालेले गोपीनाथ मुंडे आज एमसीएसमोर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहेत. मुंडेंना आज एमसीएनं वेळ दिल्याची माहिती मिळालीय.
Oct 16, 2013, 11:34 AM ISTजागावाटपावरून काँग्रेस राष्ट्रवादीपुढे नरम!
आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीशी जागावाटपाच्या वादाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. या संदर्भातसोमवारी काँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली.
Oct 15, 2013, 07:17 AM IST`एमसीए` निवडणुकीसाठी मुंडेंनी भरलेला अर्ज अवैध?
‘एमसीए’च्या निवडणुकीतून गोपीनाथ मुंडे बाद झालेत. मुंडेंनी अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज बाद ठरवण्यात आलाय.
Oct 12, 2013, 11:38 PM ISTमुदतपूर्व निवडणुकांसाठी सज्ज व्हा- शरद पवार
आंध्र प्रदेशातील तिढ्यामुळं लोकसभेच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत.
Oct 9, 2013, 10:23 PM ISTतिसरी आघाडीच ठरवणार पुढचा पंतप्रधान - मुलायम
२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीच तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय.
Oct 7, 2013, 12:39 PM IST‘मनरेगा’द्वारं आता मिळणार फोन आणि इंटरनेट
२०१४ लोकसभा निवडणुकीच्या प्रार्श्वभूमिवर सरकार नवनवीन योजना जाहीर करतंय. आता एक नवी योजना सरकारनं जाहीर केलीय. ती म्हणजे आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) देशातल्या अडीच कोटी लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सरकार देणार आहे.
Sep 30, 2013, 02:11 PM ISTश्रीनिवासनच होणार बीसीसीआयचे ‘सुप्रीमो’!
एन. श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे पुन्हा सुप्रीमो होणार असून आता त्यावर केवळ शिक्कामोर्तब होण बाकी आहे.
Sep 28, 2013, 10:19 PM IST