Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीत बैठकांचा जोर वाढला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले तेव्हा शिवसेना खासदारांनी शिंदेंचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ दिल्लीत आल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी यावेळी दिली. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात अडचण नसल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय. तर जे.पी.नड्डा आणि अमित शाहांमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक आयोजीत करण्यात आली. कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होऊ शकते.
अमित शाहांच्या घरी रात्री साडे दहा वाजता महायुतीची बैठक सुरु झाली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे अमित शाहांच्या घरी बैठकीसाठी हजर होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही अमित शाहांच्या घरी आधीच पोहोचले. महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.
अजित पवार आणि फडणवीसांमध्ये सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सुमारे 2 तास बैठक झाली. बैठकीत अजित पवाराकडून काही प्रस्ताव ठेवले गेले अशी चर्चा आहे. महायुतीच्या बैठकीच्या पूर्वी राष्ट्रवादी च्या मंत्रिमंडळाला घेऊन प्रस्तावा वर चर्चा झाल्याचेही समजते.