'मी दुसऱ्यांदा प्रेमात पडले', ए आर रहमान यांच्या घटस्फोटानंतर मोहिनी डे झाली व्यक्त, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

गेल्या काही दिवसांपासून संगीतकार ए आर रहमान आणि त्यांच्या टीममधील मोहिनी डे चर्चेत आहे. याला कारण आहे त्यांचा घटस्फोट. या दोघांनी आपापल्या खासगी जीवनात जोडीदाराकडून घटस्फोट घेतला आहे.   

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 28, 2024, 07:24 PM IST
'मी दुसऱ्यांदा प्रेमात पडले', ए आर रहमान यांच्या घटस्फोटानंतर मोहिनी डे झाली व्यक्त, व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?  title=

एआर रहमान यांनी आपला 29 वर्षांचा संसार मोडून सायरा बानोला घटस्फोट दिला आहे. तर मोहिनी डेने देखील आपल्या पतीसोबतचे नाते तोडून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यासगळ्या दरम्यान एआर रहमान आणि मोहिनी डे यांच्यात नातं असल्याच सांगण्यात आलं. घटस्फोटाचं कारण यांच्यातील नातं असल्याच सांगण्यात आलं. पण आता या सगळ्यात मोहिनी डेची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे. यामध्ये मोहिनी आपण पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचं सांगते. 

मोहिनी डेची पोस्ट 

मोहिनी डे तिचे इलेक्ट्रिक बास वाजवतानाचा पोस्ट शेअर करते. या पोस्टला कॅप्शन देण्यात आले होते, "मला वाटते की, मी दुसऱ्यांदा प्रेमात पडलो आहे." पोस्ट मूळतः तिच्या प्रिय वाद्यासाठीची आहे. ती पुन्हा एकदा आपलं वाद्य आणि संगीताच्या प्रेमात पडल्याचं यामधून सांगण्यात येत आहे. या पोस्टने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दुसऱ्यांदा प्रेमात पडली म्हणजे ए आर रहमान आणि मोहिनी यांच्यात नक्कीच काही आहे, असं अंदाजही सुरुवातीला वर्तवण्यात आला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohini Dey (@dey_bass)

एआर रहमान पितासमान

एआर रहमानसोबतच्या अफेअरबद्दल ऐकल्यानंतर मोहिनी डे पुढे आली आणि एआर रहमान हे तिच्या वडिलांसारखे असल्याचे वक्तव्य केले आणि त्यानंतर आता एआर रहमानचे चाहते मोहिनी आणि एआर रहमानच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. तो ट्रोल्सना चोख प्रत्युत्तर देत असून त्याने माफी मागितल्याची चर्चा आहे.

एआर रहमानचे चाहते ट्विटर आणि इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत आणि ते ट्रोलला चोख प्रत्युत्तर देत आहेत, ट्विटरवर एका वापरकर्त्याने मोहिनी डे आणि एआर रहमान यांच्यातील नात्याबद्दल बोलले आणि म्हटले की त्यांचे नाते हे पवित्र नाते आहे, परंतु लोक त्याला अश्लील संबंध बनवले होते. लोकांनी बोलण्यापूर्वी आणि पोस्ट करण्यापूर्वी एकदा विचार केला पाहिजे कारण ज्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्या जातात त्यांच्याबद्दल अशा बातम्या त्यांचे आयुष्य उध्वस्त करू शकतात.