शिवाजी पार्कवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था पाहिल्यास, एखाद्या राजकीय निवडणुकीलाही लाजवेल असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात लागू करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अनेक पोलिसांना या परिसरात तैनात केलय.
Feb 18, 2013, 09:45 AM IST`अभामनाप` निवडणूक मतदान आकडेवारीवरून वाद
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतील निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरुनही वाद झालाय. साडेचार हजारांपेक्षा अधिक मतदान झालंच कसं ? असा सवाल नटराज पॅनलचे विनय आपटे यांनी केलाय.
Feb 18, 2013, 08:23 AM ISTभाजपमध्ये निवडणुकीची धूरा कुणाकडे?
एकीकडे काँग्रेसनं राहुल गांधींना उपाध्यक्षपदी बसवून पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची सूत्रं अप्रत्यक्षरित्या बहाल केली आहेत. त्यामुळे आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये निवडणुकीची धुरा कोणाकडे असणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
Jan 20, 2013, 07:54 PM ISTफातिमा भुट्टो निवडणूक लढविणार
पाकिस्तानमध्ये पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार नसला तरी चुलत बहिण फातिमा भुट्टो ही निवडणूक लढण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे.
Dec 3, 2012, 04:53 PM ISTनांदेडमध्ये आज मतदान
नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी उद्या मतदान होणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये यावेळीही चित्र फारसं वेगळं असण्याची शक्यता नाही. मात्र आदर्श घोटाळ्याचा आरोप झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
Oct 13, 2012, 05:05 PM ISTचंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.
Apr 16, 2012, 02:11 PM ISTमुलायम भविष्य, देशात मध्यवर्ती निवडणुका
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी जी जाहीर आश्वासने दिली होती, त्याची तात्काळ अमलबजावणी करा आणि सहा महिन्यात बदल करून दाखवा, हे सांगताना लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांसाठी तयार राहावे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी भविष्यवाणी केली आहे.
Mar 24, 2012, 12:31 PM IST'समाजवादी'कडून राज्यसभेसाठी जया बच्चन
समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी बिग बीच्या सौभाग्यवती आणि बॉलिवूडमधून राजकारणात गेलेल्या जया बच्चन यांनी अर्ज दाखल केला आहे.
Mar 17, 2012, 03:47 PM ISTकाँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया
पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.
Mar 7, 2012, 10:36 PM ISTगोव्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
गोव्यात मतदानादरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. पणजीत मतदान केंद्रावर ही धक्काबुक्की झाल्याने निवडणुकीला गालबोट लागले आहे.
Mar 3, 2012, 11:43 AM ISTनाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक
बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.
Feb 21, 2012, 09:57 PM ISTसेनेनं मुंबई, ठाणे 'जिंकून दाखवलं'
मुंबई महापालिकेवर गेली १७ वर्षे फडकणारा शिवसेना-भाजप युतीचा भगवा पुन्हा एकदा फडकणार आहे. शिवसेनेच्या करून दाखवलंची टिंगल केली होती. मात्र, सेनेने जे काही करून दाखवलं त्याच्याच जीवावर पुन्हा मुंबई,ठाणे पालिका जिंकून दाखवली.
Feb 18, 2012, 01:18 PM ISTमतदारराजा दिवस तुझाच आहे!
आजचा दिवस आळसात घालवण्याची तुमची कितीही इच्छा असली तरी मतदान चुकवू नका असं आमचं आग्रहाचं सांगणं आहे. कारण आजचा निर्णायक क्षण तुम्ही चुकवलात तर परत पाच वर्षे ही नामी संधी मिळणार नाही हे लक्षात ठेवा. गेल्या पाच वर्षात तुमच्या प्रभागाची वाट ज्यांनी लावली असेल किंवा शहराचा सत्यानाश केला असेल त्यांना धडा शिकवण्याची ही वेळ आहे ती चुकवू नका.
Feb 16, 2012, 01:13 PM ISTशिक्षकांना मिळावी मतमोजणीनंतर सुट्टी
निवडणूकीच्या कामासाठी शिक्षकांनाच राबवले जाते. मात्र शिक्षक नेहमीच विनातक्रार निवडणूक आयोगाचे काम करतात. १६ फेब्रुवारीला तर सकाळी ५ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत शिक्षक निवडणुकीच्याच कामात राहणार आहेत.
Feb 16, 2012, 09:46 AM ISTनिवडणूक : राज्यात कडेकोट बंदोबस्त
राज्यातील उद्या होणाऱ्या (दि. १६) मतदानासाठी तब्बल २५ हजारावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मतदानाची पूर्ण तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, उद्या सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Feb 15, 2012, 09:33 PM IST