ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.
Jan 29, 2014, 11:12 AM ISTराज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार
राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.
Jan 28, 2014, 12:58 PM ISTराज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान
महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणार्याम सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्यानं तेही या निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे.
Jan 14, 2014, 09:19 AM IST`सरकारमधून बाहेर पडू`, निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचा फुसका इशारा
सरकारमध्ये असून काम होत नाहीत आणि त्यामुळे आम्ही टार्गेट होतो, म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
Jan 13, 2014, 07:38 PM ISTतरुणाईचं मन जिंकण्याची आदित्य ठाकरेवर जबाबदारी
राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.
Jan 5, 2014, 08:24 PM ISTएप्रिल-मे महिन्यात वाजणार लोकसभेचा बिगूल -पीटीआय
आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. निवडणुकांचं आता काऊंटडाऊन सुरु होणार आहे. कारण एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलंय.
Jan 5, 2014, 04:58 PM ISTमहाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
Dec 29, 2013, 09:03 PM IST‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...
गेले दोन दिवस गायब असलेले ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर आज सर्वप्रथम `झी २४ तास`वर अवतरले. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसून चार दिवस विश्रांतीसाठी म्हणून आपण बाहेर फिरायला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.
Dec 25, 2013, 06:27 PM ISTहाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक
आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.
Dec 23, 2013, 08:45 AM IST‘दादा’साठी सर्वच पक्षांची बॅटिंग!
आगामी लोकसभेसाठी भाजपने ऑफर केलेलं तिकीट सौरव गांगुलीनं नाकारल्यानंतर आता इतर पक्ष गांगुलीसमोर निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहेत.
Dec 16, 2013, 09:06 PM ISTललित मोदी पुन्हा निवडणूक आखाड्यात
आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगचे माजी सुप्रीमो ललित मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या रेसमध्ये ललित मोदी असणार आहेत.
Dec 16, 2013, 08:53 PM ISTकाँग्रेसनं लोकसभेच्या सर्व जागा लढवाव्यात- अजित पवार
५ राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल पाहता काँग्रेसनं लोकसभेच्या राज्यातल्या सर्व ४८ जागा लढवाव्यात, असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मारलाय.
Dec 13, 2013, 05:38 PM ISTदिल्लीत सरकार बनविण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करणार ‘आप’
देशाची राजधानी दिल्लीत सरकार बनविण्यासंदर्भातल्या आपल्या भूमिकेबाबत आता आम आदमी पक्ष थोडा नरमलेला दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार आता ‘आप’ दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे. पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरी ‘आप’ची बैठक सुरु आहे. ज्यात पहिल्यांदाच दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या पर्यायांबाबत आपण विचार करत असल्याचं सांगण्यात येतंय.
Dec 13, 2013, 03:56 PM IST‘आप’ आणि ‘भाजप’नं एकत्र यावं- किरण बेदी
दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी सत्ता स्थापण्या ऐवजी विरोधी बाकांवर बसण्यास पसंती देत असताना किरण बेदींनी मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सूचना केलीय.
Dec 9, 2013, 02:52 PM ISTछत्तीसगडमध्येही भाजपची विजयाची हॅट्ट्रीक!
अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या छत्तीसगडमध्ये अखेर भाजपचीच सत्ता आलीय. मुख्यमंत्री रमण सिंह यांनी सत्तेची हॅटट्रीक केलीय. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभा असलेल्या बस्तरनं यावेळी मात्र भाजपची साथ सोडली. छत्तीसगडमध्ये अपेक्षेप्रमाणं भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला हा चुरशीचा सामना भाजपनं जिंकला.
Dec 9, 2013, 08:26 AM IST