काँग्रेस प्रचारापासून मनमोहन सिंग लांबच
उगवत्याला नमस्कार करायचा, आणि मावळत्याकडे पाठ फिरवायची, राजकीय नेत्यांना हे मुळीच नवं नाही. असंच सध्या सुरू आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या सभा, रॅलींमधून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर नेते दिसतायेत. मात्र दहा वर्षांपासून पंतप्रधानपदावर असलेले मनमोहन सिंग यांचा पत्ताच नाही. गेली दहा वर्षं ज्यांनी या देशाला सांभाळलं ते सिंग आज किंग राहिले नाहीत.
Apr 12, 2014, 09:44 PM ISTनिवडणूक आयोगाची `वाचाळ` नेत्यांवर कारवाई
भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आणि सपाचे नेते आझम खान यांच्या सभांवर बंदी घातलीय.
Apr 12, 2014, 07:59 AM ISTगोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांकडे लक्ष
गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठीचा प्रचार संपलाय. गोव्यात लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन जागा असून मतदान १२ एप्रिलला होतंय.
Apr 11, 2014, 11:30 PM ISTउत्तर मुंबईत लोकसभेची काँग्रेसला निवडणूक जड
उत्तर मुंबईमधली लढत यंदा लक्षवेधी ठरणार आहे. खरं तर या मतदारसंघात सुरुवातीपासून काँग्रेसचं नामोनिशाणही नव्हतं. पण गोविंदा निवडणुकीला उभा राहिला आणि हे चित्र बदललं. गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचा खासदार आहे. पण आता या निवडणुकीत चित्र बदलणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Apr 11, 2014, 09:34 PM ISTपत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली
आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.
Apr 10, 2014, 07:42 AM ISTमतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.
Apr 9, 2014, 08:26 PM IST`कारगिलचा विजय हिंदू नाही तर मुस्लिम सैनिकांमुळे`
बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.
Apr 9, 2014, 08:12 AM ISTविदर्भातील निवडणूक प्रचार थंडावलाय
लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातल्या प्रचारातल्या तोफा थंडावल्या आहेत. तिस-या टप्प्यातलं मतदान 10 तारखेला होणार आहे. तिस-या टप्प्यात देशभरातल्या 92 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात विदर्भातल्या 10 जागांचाही समावेश आहे.
Apr 8, 2014, 10:05 PM ISTपद्मसिंह पाटलांच्या ताफ्याखाली चिरडून मुलीचा मृत्यू
लोकसभा निवडणुकीच्या आधीच एका निष्पाप आणि कोवळ्या जीवाला आपल्या प्राणास मुकावं लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांचा प्रचार सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 8, 2014, 04:55 PM ISTमनसे लोकसभा निवडणुकीसाठी कोकणात `नोटा` वापरणार
लोकसभा निवडणुकीत रंगतदान लढतीमध्ये कोकणचा समावेश आहे. याठिकाणी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राणेंविरोधात काम करण्याची भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. आपली मते कोणाच्या वाट्याला जाऊ नयेत म्हणून मनसे नकाधिकार म्हणजेच `नोटा` (यापैकी कोणीही नाही) याचा वापर करणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन होणार नसल्याने काँग्रेसला याचा फटका बसू शकतो.
Apr 8, 2014, 04:40 PM ISTएका महिन्यात तीन ड्राय डे; तळीरामांची पंचाईत
लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यानं सुरु झाल्यात... महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. यादरम्यान राज्यात तीन टप्प्यांत ड्राय डे घोषित करण्यात आलाय.
Apr 8, 2014, 04:18 PM ISTमहायुतीचा अपेक्षाभंग होऊ शकतो का?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे.
Apr 8, 2014, 01:29 PM ISTया सेलिब्रिटींची मुंबईतील मतदानाला दांडी !
मतदानाबाबत जनजागृती करणा-या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींच मतदानाच्या दिवशी दांडी मारणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडची मंडळी गेली काही दिवस करतायत. हाच उंचावून सामान्यांना उपदेशाचे डोस पाजणारे हे कलाकार मात्र मतदानाच्या दिवशी अमेरिकेत असणार आहे.
Apr 4, 2014, 03:48 PM ISTकाँग्रेसचे उमेदवाराच्या ऑफिसवर छापा, सांगलीत रोकड सापडली
काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांच्या ऑफिसवर छापा पडलाय. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलीय. नागपूरच्या ग्रेट नाग रोड परिसरातील ही घटना आहे. तर सांगलीत लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Apr 4, 2014, 01:38 PM ISTसामनातून उद्धव ठाकरेंनी फुंकलं निवडणुकीचं रणशिंग!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी सामनातून मुलाखत दिलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणुकांचं महत्त्व स्पष्ट केलंय.‘‘ही लढाई केवळ स्वार्थासाठी नाही, तर देशासाठी आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकू,’’ असा निर्धार त्यांनी केलाय! शिवसेनेतून जे निवडणुकीच्या तोंडावर गेले ते एकटेच गेले. ते नुसतेच नाममात्र होते
Mar 30, 2014, 09:14 AM IST