www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यंदा कॉलेजमध्ये निवडणुका होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती मात्र आता विद्यापीठाने काढलेल्या नविन परिपत्रकानुसार जीएस निवडणुका जुन्या पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
कॉलेजमध्ये यावर्षी निवडणुका होणार नाहीत..विद्यापीठाच्या नव्या परिपत्रकानुसार कॉलेज आणि विद्यापीठाच्या जीएस निवडणुका या दरवर्षीप्रमाणे नामनिर्देशकाप्रमाणेच होणार आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत कॉलेजला त्यांचा जीएस निवडण्याच्या सुचना विद्यापीठाने दिल्या आहेत. राज्य सरकारकडून कोणत्याही सुचना आल्या नसल्याने विद्यापीठाने हे परिपत्रक जारी केलंय.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी स्वत: कॉलेज निवडणुकांबाबत राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती दिली..यानंतर तातडीने सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटना कामाला लागल्या..निवडणुकांना आमचा पाठिंबा असल्याची वक्तव्य केली जाऊ लागली कारण मुळातच येणा-या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत युवा मतदारांचा फायदा सर्वच राजकीय पक्षांना होणार होता मात्र, आता या सर्वांवर विरझण पडलं. तर दुस-या बाजूला कॉलेज निवडणुकांची पार्श्वभूमि पाहता या निर्णयामुळे विद्यार्थी,पालक तसंच प्राध्यापकांनाही मोठा दिलासाच मिळालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.