निवडणूक

निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंगवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. त्यामुळे आता मतदारांना उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी EVM मशिनमध्ये `रिजेक्ट`चं बटण द्यावे, असं सर्वोच्च न्यायालयने हा निर्णय देताना म्हटलं आहे.

Sep 27, 2013, 11:52 AM IST

भाजपचा सत्तेचा मंत्र, जोडणार आता नवे मित्र

2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला आपली सत्ता यायला हवी असेल, तर त्यांना आहे ते सहकारी पक्ष टिकवण्यासोबतच नवे मित्र जोडावेही लागणार आहेत.

Sep 23, 2013, 09:23 PM IST

एमसीएच्या आखाड्यात आता मुंडे, सरदेसाई सुद्धा!

शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ आता भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीही एमसीए निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केलीय. तर तिकडे मनसेचे नितीन सरदेसाईसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

Sep 17, 2013, 11:56 AM IST

निवडणुकीची बारी अन् गणेश मंडळांची चैन भारी!

यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्त्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका...

Sep 10, 2013, 11:43 PM IST

शिवाजीराव मोघेंचा आघाडीला घरचा आहेर!

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तोडून स्वतंत्रपणे स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करत, आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय. ते रामटेक लोकसभा क्षेत्राच्या केंद्रस्तरीय मतदार अभिकर्ता यांच्या मेळाव्यात बोलत होते.

Sep 10, 2013, 06:40 PM IST

मोदींचं नव्या ‘ABCD’द्वारं काँग्रेसवर टीकास्त्र...

राजस्थानची राजधानी जयपूर इथं आपल्या पहिल्या रॅलीला संबोधित करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि केंद्रसरकावर टीकास्त्र सोडलं. राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराचं मोदींनी रणशिंग फुंकलं. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार याची नवीन एबीसीडीच मोदींनी मांडली.

Sep 10, 2013, 03:32 PM IST

मराठमोळ्या स्वाती दांडेकर अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत!

अमेरिकेच्या राजकारणात मराठी झेंडा फडकताना दिसत आहे. मूळच्या नागपूरच्या असलेल्या स्वाती दांडेकर यांनी अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षामध्ये आपली उमेदवारी जाहीर केली आहे..

Sep 2, 2013, 06:38 PM IST

ठाण्यात विजय कुणाचा?

ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान झालंय..त्यामध्ये एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे.या निवडणुकीत मुंब्रा प्रभागातून राष्ट्रवादीला चांगले मतदान पडेल असे चित्र स्पष्ट आहे.

Sep 1, 2013, 11:54 PM IST

मतदार जिथे `सिंग`, तिथे हवा `भांगडा किंग`!

काँग्रेसने पंजाबी लोक मोठ्य़ा प्रमाणावर असणाऱ्या मतदारसंघात लोकांना आकर्षित करण्यासाठी पंजाबी पॉपस्टार दलेर मेहंदीला निवडणुकीतच उभं करण्याचं ठरवलं आहे.

Aug 27, 2013, 04:50 PM IST

MCAची निवडणूक, शरद पवार मैदानात

मुंबई क्रिकेट असोसिएशनची द्वैवार्षिक निवडणूक १८ ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Aug 13, 2013, 04:53 PM IST

सेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण...

‘आपण लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये आहोत’ असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय.

Aug 9, 2013, 05:30 PM IST

दक्षिण मध्य मुंबईतून मनोहर जोशी मैदानात!

ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झालीये. त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं आता शिवसेनेतल्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.

Aug 9, 2013, 12:38 PM IST

आदित्य ठाकरे स्वतः उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?

प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात न उतरता, राजकारणात आपला रिमोट कंट्रोल चालवणा-या ठाकरे घराण्याची नवी पिढी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार झाली आहे. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

Jul 20, 2013, 11:50 PM IST

`दोषी आमदार, खासदारांना निवडणूक बंदी`

जेलची सजा भोगून बाहेर आलेल्या आणि जेलमध्ये असणाऱ्यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदार, खासदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही.

Jul 10, 2013, 03:59 PM IST

मतांसाठी पैसे... पैशांसाठी मतदान?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची एकमेकांवरील चिखलफेक आणि मतांसाठी पैसे वाटपाचं फुटलेलं बिंग या पार्श्वभूमीवर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी आज मतदान होतंय.

Jul 7, 2013, 09:09 AM IST