मुंबई मोनोरेलला भाजपचा 'रेड सिग्नल'
मुंबईतल्या मोनोरेलची होणारी चाचणी पुन्हा रद्द करण्यात आली आहे. ही चाचणी बुधवारी होणार होती, परंतु भाजपनं निवडणूक आयोगाकडं चाचणीविरोधात तक्रार केल्यानंतर मोनोरेलची होणारी चाचणी रद्द कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Feb 15, 2012, 10:13 AM ISTआज प्रचार तोफा थंडावणार
पालिका निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार असल्यानं सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही जोरदार प्रचार सुरू केला आहे. शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचता यावं यासाठी ‘रोड शो’वर उमेदवारांनी भर दिला आहे.
Feb 14, 2012, 03:50 PM ISTनक्षलवादाच्या छायेत गडचिरोलीत निवडणूक
नक्षलवादानं ग्रासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कोणतीही निवडणूक प्रशासनासाठी आव्हान ठरते. हे दिव्य पार पाडण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Feb 11, 2012, 04:35 PM ISTनिवडणूक तिकीटांवरून पुन्हा मराठा X ओबीसी संघर्ष
पुण्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बोगस ओबीसींना उमेदवारी दिल्याचा आरोप ओबीसी संघर्ष संघटनेनं केला आहे. हे उमेदवार निवडून आले तर त्यांच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष संघटनेनं दिला आहे.
Feb 11, 2012, 03:20 PM IST'नात्यागोत्या'तली निवडणूक !
आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच ठिकाणी आणि सर्वच पक्षांनी नात्यागोत्यांना तिकीटं दिली आहेत. नाशिकची निवडणूकही याला अपवाद नाही. नाशिक मनपाचं महापौर पद भूषवलेल्यांचे अनेक नातेवाईक सध्या निवडणुकीत आपलं नशीब अजमावत आहेत.
Feb 11, 2012, 11:41 AM ISTपोलीस स्टेशनमध्ये हाणामारी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यासह दगडफेक केली. जमावानं गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये घुसून दगडफेक आणि मोडतोड केली आहे.
Feb 9, 2012, 02:23 PM ISTराष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर
पुणे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालीय. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलीय.
Feb 7, 2012, 08:54 PM ISTऊस कामगार मतदानापासूनच दूरच !
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणी कामगार पाठीवर संसार घेऊन फिरत असतात. यामुळेच पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी आलेले सुमारे दोन लाख कामगार यावेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
Feb 4, 2012, 04:17 PM IST१७ फेब्रुवारीला मतमोजणीचे संकेत
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १७ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणुक आयुक्त निला सत्यनारायण यांनी तसे संकेत दिलेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
Feb 2, 2012, 12:07 PM ISTनाशकात भाजप कार्यकर्त्यांची धक्काबुक्की
नाशिकमध्ये तिकीट वाटपात डावलल्यानं भाजप कार्यकर्त्यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना धक्काबुक्की केली. सर्वसाधारण गटातून उज्वला नामदेव हिरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा रोष व्यक्त करत कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची आदळआपट केली.
Feb 1, 2012, 05:10 PM IST'युपी'मध्ये काँग्रेसकडून अश्वासनांची खैरात
युपी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपलं घोषणापत्र काढलं आहे. केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत घोषणापत्र देऊन सांगितलं की उत्तर प्रदेशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर –
Jan 31, 2012, 05:45 PM ISTसोशल नेटवर्किंगवर नो प्रचार
फेसबुक, यू ट्युब, ट्विटर सोशल नेटवर्किंग साईटस्वर प्रचारासंदर्भात मजकूर किंवा माहिती अपलोड राजकीय नेत्यांना करता येणार नाही. जर करावयाची असेल तर राजकीय पक्षांनी आयोगाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 27, 2012, 10:12 PM IST...आणि अजित पवार भडकले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्थानिक नेत्यांची चांगलीच कानउघडणी केलीये. राष्ट्रवादीच्या निवड समितीच्या सदस्यांनी आणि नेत्यांनी आपल्या समर्थक आणि नातेवाईकांच्या तिकीटासाठी फिल्डिंग लावल्यानं अजित पवार नाराज झालेत.
Jan 25, 2012, 09:00 AM ISTनिवडणूक कर्मचा-यांना मारहाण
पुण्यात आचारसंहिताभंग करुन राजकीय नेते थांबलेले नाहीत, तर निवडणूक कर्मचा-यांना मारहाणीपर्यंत त्यांची मजल गेलीय. निवडणूक कर्मचा-यांना मारहाण आणि कॅमेरा फोडण्याचा प्रकार पुण्यात घडलाय. काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घाटे यांनी ही प्रताप केलाय.
Jan 21, 2012, 07:31 AM ISTसंभाजीराजेंविरोधात गुन्हा दाखल?
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील गेल्या निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे, कामगारमंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या विरोधात निवडणुकीतील गैरप्रकारांबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Jan 19, 2012, 08:13 AM IST