www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘एमसीए’च्या निवडणुकीतून गोपीनाथ मुंडे बाद झालेत. मुंडेंनी अध्यक्षपदासाठी भरलेला अर्ज बाद ठरवण्यात आलाय.
‘एमसीए’च्या निवडणुकीत मुंडेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. ‘एमसीए’ निवडणुकीसाठी उमेदवार मुंबईचा रहिवासी असायला हवाय मात्र मुंडेंच्या पासपोर्टवर बीडचा पत्ता असल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आलाय. यामुळे गोपीनाथ मुंडे यांना जोरदार धक्का बसलाय. मुंडेंनी यावर आक्षेप नोंदवलाय. ‘मी मुंबईचाच रहिवासी आहे... आणि मी माझा आयकरही मुंबईच्याच पत्त्यावर भरतो... माझ्या पासपोर्टवरदेखील मुंबईचाच पत्ता आहे... मग, माझा अर्ज बाद कसा केला जाऊ शकतो?’ असं मुंडे यांनी म्हटलंय. एमसीएच्या या निर्णयाविरुद्ध आपण कोर्टात अपील करणार असल्याचंदेखील मुंडे यांनी म्हटलंय.
महत्त्वाचं म्हणजे, ही निवडणूक मुंडे विरुद्ध पवार अशी रंगण्याची चिन्हं दिसत होती. मुंडेंचा अर्ज बाद झाला तर पवार हे बिनविरोध निवडून येतील.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.