बोगस मतदान अहवाल देण्याचे आदेश

नाशिकच्या मतदार यादीत तब्बल सव्वा लाख नावं बोगस आढळलीत. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगानं सात तारखेपर्यंत अहवाल सादर कऱण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Updated: Feb 29, 2012, 07:25 PM IST

www.24taas.com,  नाशिक

 

 

नाशिकच्या मतदार यादीत तब्बल सव्वा लाख नावं बोगस आढळलीत. ही धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर निवडणूक आयोगानं सात तारखेपर्यंत अहवाल सादर कऱण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

 

 

ग्रामीण भागातल्या मतदारांची सर्रास शहरी भागात नावं दाखवण्यात आलीयत. झी २४ तासच्या पाठपुराव्यानंतर निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नाशिकमधल्या बोगस व्होटिंग प्रकरणी   कुणावरही कारवाई झालेली नाही. हा प्रकार उघड करुन पाच दिवस उलटून गेले तरी प्रशासन ढिम्मच होते. त्यातच या घोटाळ्याला सरकारी आशीर्वाद असल्याचीही चर्चा आहे.

 

 

निवडणूक आयोगाच्या अधिकृत सॉफ्टवेअरमध्ये फोटो, पत्ता आणि वय बदलून नवं ओळखपत्र तयार करता येतं. निवडणूक विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या कन्हैय्या परदेशी यानं हे काम स्वतः केलं आहे. एका प्रभागात त्याला दीडशे बोगस ओळखपत्र तयार करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. या प्रकरणी कन्हैय्यालाल परदेशी यानं पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला दाद दिली नाही. निदान माझ्यावर तरी गुन्हा दाखल करा, अशी मागणी  त्यांनी केली होती. याचसंदर्भात आता काही पराभूत उमेदवारांसह ३२ जणांनी याचिका दाखल केल्या आहेत.