नाशकात शिवसेनेचे मनसेवर दबावतंत्र?

नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेवर दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. हे दबावतंत्र आहे, महापौर निवडणुकीसाठी. नाशिकमध्ये मनसेने जास्त जागा पटकावून नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान पटकावले आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने सत्तेसाठी मनसेला कसरत करावी लागणार आहे. याच संधीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दबावतंत्रचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

Updated: Mar 8, 2012, 11:00 PM IST

www.24taas.com, नाशिक

नाशिकमध्ये शिवसेनेने मनसेवर दबावतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. हे दबावतंत्र आहे, महापौर निवडणुकीसाठी. नाशिकमध्ये मनसेने जास्त जागा पटकावून नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान पटकावले आहे. परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत नसल्याने सत्तेसाठी मनसेला कसरत करावी लागणार आहे. याच संधीचा लाभ उठवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यासाठी दबावतंत्रचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

अपक्षांच्या मदतीने महापौर करण्यासाठी सेनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी सेनेची फिल्डींग लावली आहे.  महायुतीला अपक्षांचा पाठिंबा असल्याची माहिती नाशिकचे संपर्क नेते अरविंद सावंत यांनी दिली. नाशिकमध्ये शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा सावंत यांनी केला आहे. १५ मार्चला महापौर निवडणुकीसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सेनेने राजकीय वातावरण तापविण्यास सुरूवात केली.

शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र बैठका घेण्यासाठी सुरूवात केली आहे.  या बैठकीला अपक्षांची साथ मिळाली आहे.  पालिकेची संख्याबळ १२२ आहे. मात्र, मॅजिक फिगर ६२ आहे. त्यामुळे नाशिकचे आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, शिवसेना-भाजपकडे ३६जागा आहेत. त्यामुळे आम्ही अपक्षांच्या मदतीने मॅजिक फिगर गाठू शकतो. त्यामुळे सेनेचाच महापौर होईल, असे अरविंद सावंत यांचे म्हणणे आहे. त्यामुळे १५ मार्चला काय जादू होते, याकडे लक्ष लागले आहे.

मनसेकडून  बोलणी नाही - सावंत

दरम्यान, मनसेकडून काहीही बोलणी सुरू होत नसल्याने शिवसेनेनाला ठोस भूमिका घेता येत नसल्याची माहिती, अरविंद सावंत यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेचा इगो पुढे आल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात शिवसेनेला मदत करण्यासाठी सेनेच्या आमदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर जनमताचा कौल लक्षात घेऊन आपण पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर सेनेचा ठाण्यात सत्तेचा मार्ग मोकळा झाला. नाशिकमध्ये मनसेने सेनेशी बोलणी करण्याची अपेक्षा सेनेला आहे. मनसेनेने काहीही हालचाल न केल्याने हे   दबावतंत्र सुरू आहे, अशी चर्चा आहे.