राज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.

Updated: Oct 6, 2014, 09:21 AM IST
राज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.

१) महाराष्ट्रातलं प्रकल्प गुजरातला का नेले?
महाराष्ट्रातील कोस्ट गार्डचा प्रकल्प गुजरातमधील पोरबंदरला का हलवला?, नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे, अजुनही ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे का वागतायत?, महाराष्ट्रातलं सर्व काही गुजरातला नेण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण बहुमत द्यावं का?, असे घणाघाती सवाल राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहेत.

२) भाजपकडे महाराष्ट्रात चेहराच नाही
 नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचार सभेला आल्यावर म्हणाले, मुंडे असते तर मला प्रचाराला येण्याची गरज भासली नसती. यावरून मोदींनीच राज्यातील भाजप नेत्यांची लायकी काढली, हे सिद्ध झाल्याचं राज यांनी जाहीर सभेत सांगितलं. 
 
३) मोदी देशाचे की गुजरातचे पंतप्रधान?
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा जपान दौऱ्याला गेले, जपान भेटीनंतर मोदींनी बुलेट ट्रेनची घोषणा मुंबई-अहमबाद या मार्गावरच का केली? कोणता मराठी माणूस गुजरातला जातो? त्यामुळे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे?, तसेच मोदी सध्या गुजरातचे पंतप्रधान असल्याप्रमाणे का वागतायत, असा प्रहार राज ठाकरे यांनी केला.

४) महाराष्ट्रातलं सर्व काही गुजरातला न्यायचंय?
काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन मुंबईत आल्या.  महाराष्ट्रात येऊन इथल्या उद्योजकांना गुजरातला येण्याचं आवाहन करतात. मुंबईत काय आहे, ट्रफिक आहे, असा प्रचार करतात, म्हणजे त्यांना महाराष्ट्रातील सर्व काही गुजरातला न्यायचं आहे का, असंही राज यांनी नमूद केलं.
 
५) ओबामाचं ‘केम छो’का?
 अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हुशार आहेत, त्यांना माहित असतं, कुणाला काय बोललं म्हणजे कोण खुश होतं, म्हणून मोदी अमेरिकेला जाऊन आले तेव्हा ओबामांनी मोदींचं ‘केम छो’म्हणत स्वागत केलं, त्यावेळी मोदींनी हिंदीत बोलणं अपेक्षित होतं. मात्र ओबामांनीही गुजराती भाषेत त्यांचं स्वागत केले, पुन्हा एकदा मोदी गुजरातचे की भारताचे पंतप्रधान? असा प्रश्न उपस्थित होतोय.

६) भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्या उमेदवारांची यादी वाचली

राज ठाकरे यांनी यावेळी भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांना आणि उमेदवारी मिळालेल्यांची यादी वाचली.

७) बाळासाहेबांमुळे भाजपला बळ
महाराष्ट्रात भाजपला बाळासाहेब ठाकरेंमुळे बळ मिळालं, आता हे बेटकुळ्या काढून दाखवत आहेत, असा हल्लाबोल राज यांनी नरेंद्र मोदींवर केला.
भाजपमध्ये ३५ ते ४० आयाराम आणले असल्याची टीका राज यांनी केली तसेच ते कोणत्या पक्षातून भाजपमध्ये आले याची यादीच वाचून दाखवली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.