मुंबई : भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
यावेळी बाजारात पैसा दाखल होतो, असा व्यावसायिक सांगतात, झेंडे आणि प्रचाराचं साहित्य विकणाऱ्यांची चांदी होते. मात्र यावेळी हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपन्यांची देखिल मोठ्या प्रमाणात चांदी होतांना दिसत आहे.
शिवसेना- भाजपची युती तुटली, दुसरीकडे काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी फुटली यामुळे चारही पक्षांनी प्रचारासाठी वेगवेगळ्या वाटा निवडल्या, स्टार प्रचारक वाढले, त्यांच्या येण्याजाण्यासाठी हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांची सोय करण्यात आली.
राजकीय पक्षांकडून हेलिकॉप्टर भाड्याने देणाऱ्या कंपन्यांकडे मोठी मागणी केली जात आहे. यावेळी राजकीय पक्षांकडून ही मागणी दुपटीने वाढलीय, भाजपाने १० हेलिकॉप्टर रिझर्व केले असल्याचं सांगण्यात येतंय.
मागच्या निवडणुकीत राजकीय पक्षांकडून एकूण २० - २२ हेलिकॉप्टरची मागणी होत होती, यावेळी ही संख्या ४०-४५ वर जाऊन पोहोचली आहे.
राष्ट्रवादीने प्रचारासाठी एक छोटं विमान आणि दोन हेलिकॉप्टरचं रिझर्व्हेशन करून ठेवलंय.
या हेलिकॉप्टरचं भाडं ८५ हजार ते दीड लाख रूपये प्रति तासपर्यंत घेतलं जातं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.