परभणी : मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या आरोपाखाली परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातील दोन उमेदवारांना निवडणूक आयोगानं अटक केल्यानं एकच खळबळ उडाली. पण, अटक केल्यानंतर काही वेळातच या दोघांनाही जामीन मिळालाय.
2 ऑक्टोबर रोजीतांदुळवाडी इथं प्रत्येक मतदाराला 900 रुपये प्रमाणे पैसे वाटप झाल्याचं निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आलं होतं... चौकशी केल्यानंतर शनिवारी रात्री दोन वाजता गाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांना घरातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या फॉर्महाऊसची तपासणी करण्यात आली. तर शनिवारी पोलिसांनी 1,87,450 रुपये एका जीपमध्ये पकडले. कपबशी चिन्ह असलेल्या उमेदवारानं हे पैसेवाटप केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रीय समाज पक्षा'चे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली. त्यांच्यावर पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखविल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला. पण, काही वेळानंतर दोघांचीही जामिनावर सुटका झाली.
‘गंगाखेड’चा इतिहास...
राखीव असलेल्या परभणीतल्या गंगाखेड मतदारसंघात 1978 ते 1995 पर्यंत सलग 17 वर्ष निर्वाचित शेकापचे आमदार ज्ञानोबा गायकवाड निवडून आले... 1905 मध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून बायकोसहीत रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणारे राज्यातील पहिलेच आमदार...
पण, 1995 साली मतदारसंघांच्या शोधात असणाऱ्या अभ्युदय बँकेचे चेअरमन असणाऱ्या सीताराम घनदाट यांनी हाच मतदार संघ निवडला. तेव्हापर्यंत गंगाखेडची काहीही माहिती नसणारे घनदाट 1995 साली निवडून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या... पहिल्या निवडणुकीपासून घनदाट यांच्यावर अनेकदा पैसेवाटपाचे आरोप झाले होते...
‘विधानसभा 2014’साठी गंगाखेड मतदारसंघात शिवसेनेचे डॉ. शिवाजी दळणार, काँग्रेसचे हरीभाऊ शेळके, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे तर मनसेचे बालाजी देसाई रिंगणात आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.